Baravi Dam water sakal
मुंबई

Thane News: बारवी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये दोघेजण गेले वाहून; जिल्हा प्रशासनाकडून शोधकार्य सुरु

मागील दोन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून दुधडी भरून वाहू लागले आहे.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - मागील दोन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून दुधडी भरून वाहू लागले आहे. अशातच मुरबाड तालुक्यातील टाकीची वाडी येथील दोघेजण वाहून गेल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच अग्निशामक दलाच्या जवानांकडून घटनास्थळी धाव घेवून शोधकार्य सुरू केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अशातच मागील दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पातळीत वाढ होवून पाण्याचा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर, उल्हास आणि काळू या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून या नद्यांच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तर, अंबेक गावातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अशातच गुरुवारी दुपारी ३ ते ३.३० च्या दरम्यान, टाकीचा पाडा येथील रहिवाशी गणेश चिंधू केणे (३५) राहणारा डोंगरनाव्हे व ज्ञानेश्वर बुधाजी गोंधळी (३५) राहणार शास्त्रीनगर (दुधाळेपाडा) हे दोघे बारावी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये वाहून गेल्याची घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच अग्निशामक दलाच्या जवानांकडून घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरु केले असल्याची माहिती तहसीलदार संदीप आवरी यांनी दिली. मात्र, हे दोघे कशासाठी त्या ठिकाणी गेले होते, हे मात्र, अद्याप समजू शकले नाही.

७७ वर्षीय आजी बाई जखमी

मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील मौजे शेरे येथील घर पडून गुलाब बाळू उबाळे (७७) वर्षे या आजीबाई जखमी झाल्या असून त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंद येथे उपचारासाठी दाखल करणेत आले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

Loha News : पत्नी प्रेमापोटी मूकबधिर तरुणाचे मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन

SCROLL FOR NEXT