ashish shelar uddhav thackeray  sakal
मुंबई

Mahrashtra Politics: आदित्य ठाकरें यांना लोकसभेला उतरवून निवडून आणून दाखवा; भाजपच आव्हान

सकाळ वृत्तसेवा

Mahrashtra Politics: कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त आहेत अशी खरमरी टीका करीत तुम्ही आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवा असे थेट आव्हान मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला दिले.

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतींना काळाराम मंदिरातील उपस्थितीबद्दल लिहलेल्या पत्राविषयी बोलताना शेलार बोलत होते. उद्धव ठाकरे यांना काही घडलेल्या आणि सत्य घटनांचे ज्ञान नाही. ते आमच्या विश्व हिंदू परिषदेच्या ट्विटर हँडलवर जरी केले असते तरी त्यांना दिसले असते की, कालच देशाच्या राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण दिले आहे आणि हे २४ तासानंतर जागे झाले आहेत.

त्यामुळे निमंत्रण राष्ट्रपतींना पोचले आहे. यांनी सांगण्याची काही गरज नाही. यांच्या सांगण्यावरून कुणाला आम्ही निमंत्रण देणार नाही आणि हे बोलले म्हणून यांनाही आम्ही निमंत्रण देणार नाही असेही ते म्हणाले.

महायुतीचा मेळावा यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियलमध्ये होईल तर उपनगरातील दुसरा मेळावा रंग शारदातील वांद्रे येथे होईल. महायुतीतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा एकत्रितपणे होईल. मुंबईतील सहाही जागा निवडून आणू यासाठी आम्ही सर्व पक्षांनी कंबर कसली आहे असेही ते म्हणाले.मोदींचे कुटुंब आणि मोदींचे घर १४० कोटी जनता आहे.

स्वतःच्या परिवारापेक्षा देश हापरिवार मानणे ही त्यांची भूमिका आणि माझे कुटुंब माझा परिवार ही तुमची भूमिका कोठे? असेही शेलार म्हणाले.कल्याण डोंबिवली शहरात ठाकरे गटाच्या पक्षाची एक जागा निवडून आणून दाखवावी. मर्दांचा पक्ष उबाठा असेल तर त्यांनी स्वतः किंवा स्वतःच्या सुपुत्राला लोकसभेला निवडून आणून दाखवावे असे आव्हान शेलार यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT