Palghar ekanth shinde sakal
मुंबई

Palghar News: मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना पुन्हा धक्का; शिवसेनेने बालेकिल्ला केला भक्कम

मोखाड्यातील सायदे हा ऊबाठा गटाचा बालेकिल्ला होता. त्यालाच शिवसेनेने सुरुंग लावत आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा

Palghar News:   निवडणुका जवळ येऊ लागल्या तश्या राजकीय पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पळापळ सुरु झाली आहे. मोखाड्यातील सायदे हा ऊबाठा गटाचा बालेकिल्ला होता. त्यालाच शिवसेनेने सुरुंग लावत आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

सायदे ग्रामपंचायत मधील वाघ्याचीवाडी व सावरपाडा येथील जेष्ठ कार्यकर्ते,युवक, महिला यांनी आज मोखाडा तालुका शिवसेना प्रमुख अमोल पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे सायदे भागात शिवसेना भक्कम झाली आहे. (ekanth shinde palghar)

मोखाड्यातील सायदे ग्रामपंचायत क्षेत्रातील  उबाठा गटातील ग्रामपंचायत सदस्य व इतर जेष्ठ पदाधिकारी शिवसेना ( शिंदे ) गटात दाखल झाले आहेत. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य सविता झुगरे, केशव झुगरे, नामदेव गिर्हे, जगन झुगरे, यशवंत झुगरे, देवराम रेरे, सखाराम झुगरे, काशिनाथ झुगरे, राहुल झुगरे, हिरामण झुगरे, संजय झुगरे, चिंतामण ढोले, देवीदास गिर्हे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेना तालुका प्रमुख व नगराध्यक्ष अमोल पाटील यांच्या ऊपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापूर्वी शिवसेनेत दुफळी पडली होती.

त्यावेळी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत ( शिंदे गट ) आले होते. आता पुन्हा सायदे भागात ऊबाठा गटाला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सायदे भागात शिवसेनेने आपला बालेकिल्ला अधिकच भक्कम केला आहे.(Morkheda Shinde News)

यावेळी तालुका प्रमुख अमोल पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले व कुठल्याही प्रकारची मदत लागली तर शिवसेना पक्ष आपल्या सोबत असल्याचे आश्वासन दिले आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासाच्या धोरणामुळे, शिवसेना नेते आमदार रविंद्र फाटक, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांचे या भागात विकास कामे करण्याकडे व कार्यकर्त्यांकडे सातत्याने लक्ष असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे, यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले आहे. 

         यावेळी विक्रमगड विधानसभा संघटक प्रदीप वाघ, विभाग प्रमुख निलेश झुगरे, उपतालुकाप्रमुख विष्णू हमरे, मोखाडा उपनगराध्यक्ष नवसु दिघा, संजय वाघ, मंगेश दाते, नंदकुमार वाघ, दशरथ पाटील, इत्यादी शिवसेनेचे  पदाधिकारी उपस्थित होते.(maharashtra news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT