Ulhasnagar News 
मुंबई

Ulhasnagar News : पावसाळ्याच्या तोंडावर उल्हासनगर पालिका अ‍ॅक्शन मोडवर! चार अतिधोकादायक इमारतींचे पाडकाम केले सुरू

संपूर्ण शहरात कॅम्प 1 ते 5 परिसरातील प्रभागनिहाय 336 घोकादायक इमारतींची यादी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिध्द केली आहे

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : एकीकडे महानगरपालिकेने 336 धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या शक्यतेची दक्षता घेऊन उल्हासनगरातील 4 अतिधोकादायक इमारतींचे पाडकाम करण्याची सुरवात आजपासून करण्यात आली आहे.

संपूर्ण शहरात कॅम्प 1 ते 5 परिसरातील प्रभागनिहाय 336 घोकादायक इमारतींची यादी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिध्द केली आहे.सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना अधिनियमातील तरतुदीनुसार सहायक आयुक्त यांच्यामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

तसेच ज्या अतिधोकादायक इमारती मागच्या वर्षी खाली करण्यात आल्या होत्या,ज्या राहण्यास अयोग्य आहेत अशा प्रभाग समिती 4 च्या हद्दीतील 4 इमारतींचे पाडकाम आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी सुरवात केली आहे.मिनर्व्हा पॅलेस अपार्टमेंट,हिललाईन पोलीस् स्टेशन जवळ,रुपानी महल अपार्टमेंट,प्रभाराम मंदिरासमोर,गंगासागर अपार्टमेंट,सेवक बेकरीसमोर,पवनधाम अपार्टमेंट,कैलास कॉलनी, स्मशान भूमीसमोर ही पाडकाम करण्यात येत असलेल्या अतिधोकादायक इमारतींची नावे असल्याची माहिती सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT