Raj Thackeray_Yogi Adityanath_MNS Padava Melava 
मुंबई

"उत्तर प्रदेशचा विकास होतोय"; राज ठाकरेंकडून योगींचं कौतुक

मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह योगींचं कौतुक केलं.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पाडवा मेळाव्यात जोरदार भाषण केलं. यामध्ये त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला तसेच इतर राज्यातील भाजपच्या कारभाराचं कौतुकंही केलं. उत्तर प्रदेशचा विकास होतोय, अशा शब्दांत त्यांनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. (Uttar Pradesh is developing Raj Thackeray complimented UP CM yogi)

राज ठाकरे म्हणाले, आज मला आनंद होतोय की, उत्तर प्रदेशचा निकाल लागला आणि कळलं की उत्तर प्रदेशात विकास होतोय. हेच तर पाहिजे. तुम्हाला आठवतं असेल की, मी म्हणालो होतो २०१४ साली नरेंद्र मोदी सत्तेत येतील तेव्हा त्यांनी आल्यानंतर पहिल्यांदा फक्त तीन राज्यांमध्ये लक्ष द्यावं, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड. या तीन राज्यांचा त्यांनी विकास करावा. या तीन राज्यांमधून लोक बाहेर पडत आहेत. त्यांना त्यांच्याच राज्यांमध्ये रोजगार मिळू दे, त्यांना घर सोडायची वेळ येऊ देऊ नका.

आज माझ्या कानावर बातम्या येतंय की, त्या ठिकाणी विकास होतोय. तर ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक राज्यात हा विकास व्हायला हवा. प्रत्येकाचं ओझं घ्यायला महाराष्ट्र इथं बसलेला नाही. पण तुम्ही या गोष्टीचा विचार करत नाही. वर्तमान पत्रांमधील ओळी वाचता पण त्याच्या मधलं वाचत नाही, हे तुमच्याशी काय खेळत आहेत, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी जनतेला आवाहन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment : लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? दिवाळीपूर्वी खात्यात 3,000 रुपये जमा होणार का? जाणून घ्या मोठी अपडेट

IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला पाचवा सामना होणार रद्द? चिंता वाढवणारे अपडेट्स, मालिका बरोबरीत सुटणार?

अजब प्रेमाची गजब कहाणी! प्रसिद्ध ३० वर्षीय इन्फ्लुएन्सर लग्नबंधनात अडकणार, थेट ७५ वर्षीय व्यक्तीसोबत साखरपुडा पार

Navratri Day Six: आज नवरात्रीची सहावी माळ! देवी कात्यायनीची पूजा कशी करावी? जाणून घ्या मंत्र, नैवेद्य आणि पौराणिक कथा

Supreme Court: सुनावणी सुरु असताना CJI सूर्यकांत यांच्यासमोरच न्यायालयात राडा! वकिलाचा मायक्रोफोन हिसकावला, चालू प्रकरणातून वकिलाची माघार

SCROLL FOR NEXT