Video Viral  Sakal
मुंबई

मुंबईतील वडाळा स्टेशनवर पावसाचं पाणी! "पानचक्कीद्वारे वीजनिर्मिती"चा Video Viral

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. पावसाळ्यामध्ये अनेकदा नागरिकांना लोकलच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे आणि पावसाच्या पाण्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागते. याआधी अनेकदा प्लॅटफॉर्मवर पावसाचे पाणी आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले होते. तर सध्याही असाच एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये थेट रेल्वे फलाटावरच पावसाचे पाणी पडताना दिसत आहे.

रेल्वे फलाटावर असलेल्या पत्र्याच्या शेडमधून पाणी खाली गळत आहे. ज्या ठिकाणी पाणी गळत आहे त्याखाली एक फॅन असून पाण्यामुळे फॅन आपोआप फिरत आहे. सदर व्हिडिओ मुंबईतील वडाळा रोड स्टेशन येथील असून "रेल्वे प्लॅटफॉर्मवरील वीजनिर्मिती प्रकल्प" असं उपहासत्मक कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.

दरम्यान, मुंबई मॅटर्स या ट्वीटर अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला असून मुंबईकरांनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. या व्हिडिओवरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया वाचून आपल्यालाही हसू आवरणार नाही. तर अनेकांनी यावरून आपला संताप व्यक्त केला असून रेल्वे प्रशासनाकडे दुरूस्तीची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT