मुंबई

कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात, पतीची प्रकृती गंभीर; पत्नीची आत्महत्या

विजय गायकवाड

नालासोपारा :- वसईच्या मर्सेस गावातील एका कुटुंबालाच कोरोनाने विळखा घातला आहे. वयोवृद्ध सासु-सासरे, पती हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर वसईतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात पतीची प्रकृती चिंताजनक आहे. त या सर्व परिस्थिती समोर हतबल होऊन 35 वर्षाच्या पत्नीने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत वसई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

स्मिता डिसिल्वा (वय 35) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. स्मिताचा पती विवेक डीसल्वा (वय 39 ) काही दिवसांपूर्वी परराज्यात जावून आले होते. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. दरम्यान सासू-सासऱ्यांना ही कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यानच्या काळात पतीची लक्षणे वाढली आणि त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला.त्यामुळे सर्वांनाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पतीची प्रकृती दिवसागणिक चिंताजनक होत चालली. पतीच्या प्रकृतीची माहिती पत्नीला मिळाली. पतीची प्रकृती चिंताजनक बनली असल्याने मंगळवारी पत्नीने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीने एक सुसाईड नोट लिहून याला कुणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटलेय. वसई पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे. वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SL vs NZ, T20 WC: श्रीलंकेच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, न्यूझीलंडच्या फलंदाजांची हाराकिरी! पाकिस्तानच्या ताफ्यात आनंद

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

Latest Marathi News Live Update : वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रिपाईचे रास्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT