APMC-Vashi 
मुंबई

अखेर एपीएमसी मार्केट आठ दिवसांसाठी बंद

सकाळवृत्तसेवा

तुर्भे (बातमीदार) : कोरोनाच्या वाढत्या फैलावामूळे एपीएमसी मार्केट बंद करावी यासाठी तरुणांनी समाज माध्यमातून मोहिम राबविली होती. या मोहिमेचा वाढता प्रतिसाद पाहुन पुढील आठ दिवस  एपीएमसी बंद ठेवण्याचा मागणीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

मोठी बातमी ः सलाम 'त्यांच्या' कार्याला ! 'ते' सुद्धा करताय जीव धोक्यात घालून काम

नवी मुंबई शहरात 7 मे रोजी कोरोनाचा आकडा थेट 448 वर पोहोचला. 8 जणांनी या कालावधीत जीव गमावला आहे. तरदोन महिन्यात 448 रुग्णांमधील 125 रुग्ण एपीएमसी संबंधित आहेत. अखेरीस पणन खात्याचे सचिव अनुपकुमार यांच्या उपस्थितीमध्ये तुर्भे येथील एपीएमसी मुख्यालयात बैठक पार पडली. शुक्रवारी झालेल्या बैठकीत सोमवार पासून पुढील 8 दिवस भाजीपाला, कांदा बटाटा, फळ, धान्य आणि मसाला हे पाच मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार गणेश नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, शिवसेना उपनेते विजय नाहटा, विविध सामाजिक संघटना नागरिकांनी थेट मागणी केल्याने शासनाने दखल घेऊन एपीएमसी तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार पासून 17 मे पर्यंत एपीएमसीत पाचही मार्केट राहणार बंद

एपीएमसी प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीत कोकण आयुक्त शिवाजी दौंड, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त आणासाहेब मिसाळ, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, माथाडी नेता नरेंद्र पाटील आणि एपीएमसीचे संचालक प्रमुख व्यापारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : पाकड्यांनी लायकी दाखवली! इंग्लिश फॅन्सला धक्काबुक्की, धमकी अन्... पाकिस्तानी मार खाणारच होता, पण... Video

Vagdari ZP Election : बालेकिल्ल्यात भाजपचा धक्कादायक पराभव! बंडखोरी, अंतर्गत मतभेदांचा फटका; धनुष्यबाणाने केली कमळावर मात

PM Kisan 22 Installment : 2,000 रुपये अडकणार? 30 लाख शेतकऱ्यांना धक्का; पीएम किसान योजनेबाबत कृषीमंत्र्यांची संसदेत मोठी माहिती

National Highway Toll Rules : अपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर आता ‘टोल’ नाही, सुधारित तरतूद लागू

Latest Marathi News Live Update : रेल्वे दुर्घटनेवर भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचे ट्विट, उपाय योजना न केल्यावर जनतेचा संताप उसळेल असा इशारा

SCROLL FOR NEXT