Manik Bhide sakal
मुंबई

Manik Bhide Death : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचे निधन

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे (वय ८८) यांचं आज वृद्धापकाळानं राहत्या घरी निधन झालं.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे (वय ८८) यांचं आज वृद्धापकाळानं राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या मागे पती, प्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे -ेदेशपांडे ही मुलगी व एक मुलगा तसेच नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दादर - शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत सायंकाळी अंतिम संस्कार करण्यात आले.

या वेळी त्यांची नातेवाईक तसेच त्यांचे शिष्यगण उपस्थित होते. या वेळी अनेक गायक -गायिकांना घडविणाऱ्या गुरू हरपल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

माणिक गोविंद भिडे यांचा १९३५ मध्ये कोल्हापूर येथे जन्म झाला. लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होती. जयपूर- अत्रोली घराण्याचे मधुकरराव सडोलीकर यांच्याकडे त्यांनी प्राथमिक शास्त्रीय संगीताचे धडे गिरविले. गोविंद भिडे यांच्याशी त्यांनी विवाह केला. दिवंगत शास्त्रीय गायिका किशोतीताई आमोणकर यांचे त्यांनी शिष्यत्व पत्करले.

किशोरीताईंची सावली बनून राहण्याचा ध्यास त्यांनी कधीच सोडला नाही. किशोरीताई ज्या काळात आपली गायकी विविध पद्धतींनी खुलवू पाहात होत्या, त्या काळातील प्रत्येक मैफिलीत माणिकताईंची स्वरसंगत त्यांना लाभली. त्यांनी देश व विदेशात अनेक कार्यक्रम केले आहेत. माणिकताईंचे संगीत क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांनी अनेक शिष्य घडवले. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

राज्य सरकारतर्फे त्यांच्या संगीतातील अमुल्य योगदानामुळे त्यांना भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांनी त्यांची कन्या अश्विनी भिडे- देशपांडे यांच्यासह इतर अनेक शिष्य घडविले. गेली काही वर्षे त्यांना पार्किन्सन्स ह्या असाध्य व्याधीने ग्रासले होते. त्यांच्या मृत्यूने संगीतविश्वाची अपरिमित हानी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT