goa mp sadanand tanavade sakal
मुंबई

Diva News : विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला भाजपच्या गोव्याचे खासदार सदानंद तनावडेंची उपस्थिती

केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशभरात विकास भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे.

आरती मुळीक-परब

दिवा - केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशभरात विकास भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. ज्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही संकल्प यात्रा १५ नोव्हेंबर ते २६ जानेवारी या कालावधीत चालणार आहे.

ठाणे महापालिकेच्या दिवा विभाग समिती अंतर्गत दिवा येथे बुधवार व गुरुवारी या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवा येथे बुधवारी झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष राज्यसभेचे खासदार सदानंद तनावडे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होते. त्यावेळी खासदार तनावडे यांचे दिव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले.

दिवा टर्निंग येथील विकास भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात दिवावासीयांना पीएम स्वनिधी योजना, पीएम ई- बस सेवा, पीएम अमृत योजना, पीएम आवास योजना, स्वच्छ भारत अभियान आदी योजनांची माहिती देण्यात आली. दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडघे, प्रभाग अधिकारी भालचंद्र घुगे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी त्रिभुवन आर, राजेंद्र गोटे, विजय टेकवाड, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते. संकल्प यात्रेचा समारोप गुरुवारी देसाई नाका येथे होणार आहे.

यावेळी भाजपचे ठाणे पदाधिकारी विजय भोईर, विनोद भगत, अशोक पाटील, रेश्मा पवार, रोशन भगत, दिवा भाजप मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, सरचिटणीस समीर चव्हाण, युवराज यादव, महिला अध्यक्षा सपना भगत, सतीश केळशीकर, दिलीप भोईर, कमलाकर पाटील, मधुकर पाटील, सीमा भगत, गौरीशंकर पटवा, जिलाजीत तिवारी, नितीन कोरगावकर, रवी मुन्नार, विठ्ठल गावडे, प्रवीण पाटील, अजित सानप, प्रफुल्ल साळवी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT