roro jetty sakal
मुंबई

Mumbai News : दीड तासाचा विरार ते पालघर प्रवास आता अवघ्या पंधरा मिनिटावर

विरार आणि पालघर तालुक्यामध्ये खाडी असल्याने पालघर जिल्हा गाठण्यासाठी वसई-विरारकरांना वळसा घालून जावे लागते.

सकाळ वृत्तसेवा

- नितीन बिनेकर

मुंबई - विरार आणि पालघर तालुक्यामध्ये खाडी असल्याने पालघर जिल्हा गाठण्यासाठी वसई-विरारकरांना वळसा घालून जावे लागते. त्यामुळे वेळ आणि इंधनावर मोठा खर्च होतो. मात्र, आता विरार ते पालघर दरम्यान जलमार्गाने जोडण्यात येणार आहे. त्यामुळे रोरो बोटीतून विरार ते पालघरचा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटावर येणार आहे.

विरारमधील नारंगी जेट्टी बांधून तयार झाली. तर, पालघरमधील खारवाडेश्वर रोरो जेट्टी उभारण्यासाठी सर्व प्रकारच्या मंजुऱ्या मिळाल्या आहे. तर शासनने जेट्टीचा बांधकामासाठी २३. ६८ कोटी निधीला मंजुरी दिली असल्याची माहिती सागरी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला दिली आहे.

वसई-विरारकरांना पालघर जिल्हा मुख्यालयात दैनंदिन कामासाठी नेहमीच ये-जा करावी लागते. रेल्वेसह रस्तामार्गे पालघरला ये-जा करता येते. सध्या वसई किंवा विरार येथून पालघरला जायचे असल्यास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ चा (अहमदाबाद महामार्ग) वापर करावा लागतो. विरार ते पालघर सकाळी व गर्दीच्यावेळी ये-जा करताना वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय.

विरार ते पालघर रस्ते मार्गे साधारण ६०किलोमीटर आहे. वाहनांना रस्ते मार्गाने हे अंतर पार करण्यासाठी सव्वा ते दीड तास लागतोय. तर, वसई ते पालघर रस्ते मार्गे साधारण ५६.१ किलोमीटर आहे. वाहनांना रस्ते मार्गाने हे अंतर पार करण्यासाठी एक तास ३० मिनिटे लागतात. मात्र, ता सागरमाला प्रकल्पांतर्गत पालघर ते विरार जल मार्गाने जोडण्यात येणार आहे. त्यामुळे हे अंतर अवघ्या ३ किलोमीटर येणार असून वाहनचालकांचा एक तासाची बचत होणार आहे.

दीड वर्षात जलमार्ग सुरु होणार -

विरारच्या नारंगी रोरो जेट्टी बांधकाना गेल्या वर्षी पूर्ण झाले होते. मात्र,पालघरच्या खारवाडेश्वर रोरो जेट्टी काही तांत्रिक अडचणी आणि काही विभागांची मंजुरी मिळाली नव्हती. मात्र,आता रोरो जेट्टीला सर्व प्रकारचा मंजुऱ्या मिळालेल्या आहे. तसेच शासनाने सुद्धा सागरमाला प्रकल्पाअंतर्गत खारवाडेश्वर रोरो जेट्टीचा कामासाठी २३ कोटी ६८ लाख रुपयांच्या निधीला नुकतीच मजुरी देण्यात आली. येत्या १८ महिन्यात खारवाडेश्वर रोरो जेट्टी उभारण्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन सागरी महामंडळाचे आहे.

रोरो जेट्टी सुज्ज असणार -

नारंगी ते खारवाडेश्वर दरम्यान रोरो जेट्टीवर अत्याधुनिक प्रवासी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, दोन्ही रोरो जेट्टी लंगत प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, शौचालय तसेच तिकीट बुकिंग काऊंटर उभारण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या चहा नाष्टासाठी कॅफेटेरिया आणि वाहने उभे करण्यासाठी खारवाडेश्वर रोरो जेट्टीवर पार्किग सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT