Vithalwadi Station Sakal Digital
मुंबई

ठाणे : ट्रेनसमोर तरुणाने मारली उडी, डोळ्याचे पाते लवते न लवते तोच..

शर्मिला वाळूंज

डोंबिवली, ता. 23 - मेल समोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका 18 वर्षीय युवकाचे रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचले आहे. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली असून युवकाचे प्राण वाचवणारे पोलिस नाईक ऋषीकेश माने यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उल्हासनगर ५ मधील प्रेम नगर टेकडी परिसरात राहणारा कुमार पुजारी हा १८ वर्षीय तरुण बुधवारी दुपारी विठठलवाडी रेल्वे स्थानकाच्या फलाटावर रेंगाळत होता. दुपारी 2.30 च्या सुमारास मुंबईकडे जाणारी एक्स्प्रेस विठ्ठलवाडी स्थानकात येत होती. याच दरम्यान काही कळायच्या आत कुमारने रेल्वे ट्रॅकवर उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावर असलेले पोलिस नाईक माने यांनी युवकाच्या मागोमाग ट्रॅकवर उडी मारत त्याला बाहेर ढकलले व स्वतः देखील ट्रॅकच्या बाहेर उडी मारली इतक्यात बाजूने वेगाने मेल एक्सप्रेस पास झाली.

डोळ्याचे पाते लवते न लवते तोच घडलेल्या घटनेने प्रवाशांसह सर्वाचा श्वास रोखला गेला होता. मात्र मेल निघून गेल्यानंतर या युवकासह माने यांना सहीसलामत पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला. पोलिसांनी या युवकाला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात आणून त्याच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावले असून या तरुणाचे पोलिसांनी समुपदेशन केले. तर तरुणाचे प्राण वाचविणाऱ्या माने यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीस्ता नदी प्रकल्पावरून भारत-चीनमध्ये नवा संघर्ष! चिकन नेकजवळ हालचाली वाढल्या; भारताच्या चिंतेवर ड्रॅगनचं मोठं प्रत्युत्तर

Heavy Rain in Pune Ghats: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी ; भिरा येथे विक्रमी ४०७ मिमी पावसाची नोंद

GBS Virus: कोरोना महामारीनंतर 'जीबीएस'चं संकट, पनवेलमध्ये दोन रुग्ण पॉसिटीव्ह; नेमका आजार काय?

Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी..

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात ५,२२३ नव्या पदांची मेगाभरती! अनेक जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये जागा भरणार; कुठे आणि कधी?

SCROLL FOR NEXT