मुंबई

पावसाचा कोटा पुर्ण; मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला परंतु, पावसाचा जोर पु्न्हा वाढण्याची शक्यता

समीर सुर्वे

मुंबई : कुलाबा येथे ऑक्‍टोबर पर्यंतच्या पावसा पेक्षा जास्त पाऊस यंदा ऑगस्टच्या 10 तारखे पर्यंत पडला आहे. कुलाब्यात आज सकाळपर्यंत 2450.2 मि.मी पाऊस झाला असून सरासरीच्या तब्बल 106 टक्के पाऊस आता पर्यंत झाला आहे. तर,ऑगस्ट महिन्याच्या संपुर्ण कालावधीतील पडणारा पाऊस पहिल्या दिवसात झाला होता. सांताक्रुझ येथे सरासरीच्या 94 टक्‍क्‍यां पर्यंत पाऊस झाला आहे. पुढील तीन दिवस मुंबईसह कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबईत यंदा पावसाळ्यात कमी दिवसात जास्त पाऊस झाला आहे.5 ऑगस्ट रोजी कुलाब्यात ऑगस्ट महिन्यातील आता पर्यंतचा सर्वाधिक 300 मि.मी हून अधिक पाऊस नोंदविण्यात आला होता. तर,संपुर्ण ऑगस्ट महिन्यात कुलाब्यात 585 मि.मी पाऊस होतो.तर,पहिल्या आठ दिवसातच या पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आता पर्यंत कुलाबा येथे 6393.2 मि.मी पाऊस झाला आहे.तर,संपुर्ण मोसमात कुलाब्यात सरासरी 2292 मि.मी पाऊस होतो.तर,यंदा आता पर्यंत 2450.2 मि.मी पाऊस झाला आहे. सांताक्रुझ येथे संपुर्ण मोसमात 2668 मि.मी पाऊस होतो. तर,आता पर्यंत 2526.6 मि.मी म्हणजे सरासरीच्या 94.70 टक्के पाऊस झाला आहे. दहा वर्षाच्या पावसाच्या आकडेवारी नुसार ही सरासरी काढली जाते.

ऑगस्टच्या पहिल्या दिवसा पर्यंत कुलाब्यात 1802 मि.मी पाऊस झाला होता. तर,सांताक्रुुझ येथे 2461.1 मि.मी पाऊस झाला होता. महामुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा ओढ दिली आहे.अधून मधून मोठ्या सरी कोळतात. पण,आता पुन्हा मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे. त्यानंतर महामुंबईत पुन्हा पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज आहे.

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT