Assembly Election 2024 Sakal
मुंबई

Assembly Election 2024 : ...तर विधानसभा निवडणूक सहज जिंकू; भाजप नेत्यांचा निर्धार; सर्व मतदारसंघ पिंजून काढणार

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बोलाविलेल्या बैठकीला राज्यातील सर्व नेते हजर होते. आत्मपरीक्षण आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात हार पत्करावी लागली असली तरी आजमितीस मिळविलेल्या मतांमध्ये एका टक्क्याची भर पडली तरी विधानसभा सहज जिंकू शकू, असा विश्वास आज भाजप नेत्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.

याआधी आपण अपप्रचाराचे शिकार ठरलो. आता तो भाग खोडून काढू असे सांगत राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांत जाण्याचा निर्धार भाजपकडून व्यक्त करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बोलाविलेल्या बैठकीला राज्यातील सर्व नेते हजर होते. आत्मपरीक्षण आवश्यक आहे.

ते करायलाच हवे आणि घरोघरी पोहोचून भाजप आणि इंडिया आघाडीच्या भूमिकेतील तफावत समजावून सांगायला हवी असे आवाहन त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीत जे झाले ते अनपेक्षित होते पण म्हणून आभाळ कोसळलेले नाही हे लक्षात घ्या असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ‘‘आपण १३० विधानसभा मतदारसंघांत पुढे आहोत. आपण काय कमावले? याची चिकित्साही झाली पाहिजे.’’

महाराष्ट्रात पराभव का झाला, खासदार संख्या का गडगडली याचा सविस्तर विचार आजच्या बैठकीत होईल, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र आजच्या बैठकीत यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. पंतप्रधानपदावर मोदींची तिसऱ्यांदा निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन करणारा ठराव पारित झाला. त्यानंतर केंद्रीयमंत्री गोयल, आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली.

मराठा समाजाची नाराजी दूर करणार

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी करणे गरजेचे असून त्यासाठी मराठा समाजाची नाराजी दूर करण्यात येईल. ओबीसी समाज आपला जुना समर्थक असल्याने त्यांना सोबत घ्या अशी सूचना भाजप आमदारांनी केली. ‘‘ वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपयांचा निधी मिळाला असा अपप्रचार सुरू आहे. प्रत्यक्षात या बोर्डाला केवळ २ कोटी रुपये मिळाले आहेत,’’ असे फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT