मुंबई

Coronavirus : वापरलेल्या लशींच्या कुप्या खरंच नष्ट झाल्या का?

बोगस लसीकरणामुळे वायल्सच्या पूनर्वापराची भीती

समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत अनेकांनी कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन या लशींचे डोस घेते आहेत. मात्र, वापरलेल्या या लशींच्या कुप्यांची विल्हेवाट कशा प्रकारे लावली गेली? हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. वैद्यकीय नियमानुसार, वापरल्यानंतर या कुप्या वैद्यकीय कचऱ्याप्रमाणे नष्ट करणे बंधनकारक आहे. मात्र, तरीदेखील मुंबईत झालेल्या बोगस लसीकरणामध्ये या वापरलेल्या कुप्यांचा वापर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. वापरलेल्या लशींच्या कुप्यांमध्ये द्रव भरून ते लस म्हणून नागरिकांना देण्यात आलं. त्यामुळे बोगस लसीकरणामुळे आता खरंच वापरलेल्या लशींच्या कुप्या नष्ट झाल्या का? हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.(What-happened-with-covid-vaccine-vials-after-vaccination)

वापरलेल्या लशींच्या कुप्यांचा कोणताही हिशोब सध्या सरकारी यंत्रणांकडे उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत आतापर्यंत अशा 4 लाख 88 हजाराहून अधिक कुप्या वापरण्यात आल्या आहेत. त्यामुळे यातील कुप्या नियमानुसार नष्ट करण्यात आल्या का? याचा शोध घेणं आता सुरु झालं आहे. पालिकेने याबाबत सर्व रुग्णालयांकडून माहिती मागवली आहे.

"वापरलेल्या कुप्यांची विल्हेवाट नियमानुसार लावली जात आहे की नाही, याची तपासणी सध्या केली जात आहे", असं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.

विल्हेवाट लावण्यासाठी नियम

वैद्यकीय कचरा उघड्यावर पडू नये तसेच शहरातील इतर कचऱ्यात मिक्स होऊ नये म्हणून तो हाताळण्याची व विल्हेवाट लावण्याची नियमावली आहे. यात,वैद्यकीय कचरा भट्टीमध्ये जाळून तो नष्ट करणे बंधनकारक आहे.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT