मुंबई

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे उघडणार तरी कधी? सुत्रांनी दिली महत्वपूर्ण माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क


मुंबई ः "अनलॉक 5'अंतर्गत 10 नोव्हेंबरपासून तमिळनाडूमधील चित्रपटगृहे सुरू होत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरू होण्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसताना चित्रपट समीक्षक कोमल नाहाटा यांनी केलेल्या ट्‌विटमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राज्यातील चित्रपटगृहे 6 नोव्हेंबरपासून सुरू होतील, असे त्यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. मात्र, राज्य सरकारच्या खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सध्या सुरू करण्याचा कोणताही विचार नाही. दिवाळीनंतर चित्रपटगृहे उघडतील, असे सूत्राने सांगितले. 

काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी चित्रपटगृहे लवकरच सुरू होतील, असे संकेत दिले होते. त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही म्हणाले होते. सांस्कृतिक कार्य विभागाने आदर्श कार्यपद्धती निश्‍चित केल्यावर चित्रपटगृहे सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनीही सांगितले होते. त्यातच आज नाहाटा यांनी ट्विट केल्यामुळे चर्चा रंगली आहे.

"24 तासांच्या आत महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 6 नोव्हेंबरपासून चित्रपटांचे नियमित खेळ सुरू करण्यात येणार आहेत,' असे त्यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. मात्र, महाराष्ट्रातील चित्रपटगृहे दिवाळीनंतरच सुरू होतील, असे संकेत मिळत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : धनगर आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, आमदार गोपीचंद पडळकर सहभागी

'ठरलं तर मग' मालिकेतील दोन अभिनेत्यांचा मुंबई लोकलने प्रवास; आला असा अनुभव, म्हणाले- एका स्टेशनवर पोलीस...

Numerology Insights: पहिल्याच भेटीत जिंकतात सर्वांचे मन! 'या' ३ मूलांकांचे लोक मानले जातात खरे 'सोशल बटरफ्लाय'!

SCROLL FOR NEXT