Mumbai News  Esakal
मुंबई

Mumbai News : दादर जलतरण तलावात मगर आली कुठून? सीसीटीव्ही फुटेज आले समोर!

दादर येथील महापालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावात मगरीचे पिल्लू आढळून आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता

अंकिता खाणे (Ankita Khane)

दादर येथील महापालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावात मगरीचे पिल्लू आढळून आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होती. मगरीचे पिल्लू वन विभागाने ताब्यात घेतले मात्र, ते जलतरण तलावात कुठून आले याचीच चर्चा रंगली होती. जवळच असलेल्या बेकायदा प्राणिसंग्रहालयातून ते आले असावे, असा अंदाज पालिकेने व्यक्त केला असून त्यावर कारवाई करावी, अशी मागणी देखील करण्यात आली होती.

तर ही मगर कुठून आली त्यासंबधी माहिती समोर आली आहे. शेजारीच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून ही मगर आल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. मगर सापडल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता. तर आता सीसीटीव्हीमध्ये ही मगर शेजारील प्राणीसंग्रहालयातून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मात्र मनसेने हा गुन्हा शेजारी असलेल्या प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर करावा अशी मागणी केली आहे.

या प्राणी संग्रहालयातूनच मगर आल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झालं असून, या प्राणी संग्रहालयावर कारवाई करून मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे. बेकायदेशीर रित्या हे प्राणी संग्रहालय चालवलं जातंय आणि तिथे प्राण्यांची तस्करी देखील होते असा आरोप मनसेच्यावतीने करण्यात आला आहे.

स्विमिंग पूलमध्ये सकाळी अनेक लोकं पोहायला येत असतात, मात्र कोणी पोहायला येण्यापूर्वीच ही मगर स्विमिंग पूलमध्ये आढळून आल्याने अनर्थ टळला आहे. दरम्यान या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! 10 ग्रॅम अन् 1 ग्रॅमसाठी आता किती रुपये मोजावे लागणार?

Aurangabad Hospital: आगीतून वाचवलेल्या जुळ्यांचा मृत्यू; एशियन हॉस्पिटलमधून दाखल केले होते 'घाटी' मध्ये, कुटुंबावर शोककळा

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : टीएमसी खासदार नदीमुल हक यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीचे छापे

SCROLL FOR NEXT