woman had immoral relationship killed by father and son accused arrested from Bihar Esakal
मुंबई

Mumbai Crime : मुलाशी अनैतिक संबध ठेवणाऱ्या महिलेचा बापाने केला खून

बापलेक फरार...साथीदाराला बिहार मधून अटक

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - एका 22 वर्षीय महिलेशी आपल्या मुलाचे असलेले अनैतिक संबंध बापाला मान्य नव्हते. या महिलेचा काटा काढण्यासाठी बापाने तिच्या खुनाचा कट रचत खून केला. यात मुलाने देखील बापाला साथ दिली. खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह हाजीमलंग भागात झाडाझुडपात नेऊन फेकून दिला होता. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने एकाला बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून अटक केली आहे.

नागा हरिणारायन यादव (वय 28) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर यातील मुख्य आरोपी लोटन सिंग व अमर लोटन सिंग हे बापलेक अद्याप फरार आहेत. तर मेनका राधाकृष्ण रवानी (वय 22) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत मेनकाशी फरार अमर याचे अनैतिक संबंध होते. मात्र त्यांच्या या संबंधास अमरचे वडील लोटन यांचा विरोध होता. मेनकाही खालच्या जातीतील असल्याने देखील लोटन विरोध करत होते.

तसेच अमरचे मेनकासोबत काही कारणास्तव वाद होत होते. त्यामुळे अमरने या महिलेचा पिच्छा सोडविण्यासाठी बापाला खुनाच्या करकटात साथ दिली. अटक आरोपी नागा याला सोबतीला घेऊन या तिघांनी खुनाचा कट रचला होता. त्यानंतर 25 ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास मृत मेनकाला आरोपी अमरने बहाण्याने कल्याण पूर्वेतील पिसवली गावात बोलवून घेतले. तर अटक आरोपी नागा आणि मुख्य आरोपी बाप हे दोघेही आदीच ठरल्याप्रमाणे घाटनस्थळी दबा धरून बसले होते.

दरम्यान संध्याकाळ नंतर अंधार पडताच मृतक महिलेने घेऊन आरोपी अमर हा अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग गडाच्या फनिक्युलर रोपवेच्या लगत असलेल्या झाडाझुडपात तिला घेऊन गेला. त्यानंतर तिन्ही आरोपींनी मिळून तिच्याच परकरच्या नाडीने तिचा गळा आवळून खून केला.

आणि घटनास्थळावरुन तिघेही फरार झाले. दरम्यान खून झाल्यानंतर दोन दिवसांनी एका अज्ञात महिलेचा मृतदेह हाजीमलंग गडाच्या फनिक्युलर रोपवेच्या लगत असलेल्या झाडाझुडपात आढळून आल्याची माहिती हिललाईन पोलीसांना मिळाली होती.

माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला होता. त्यानंतर 27 ऑक्टोंबर रोजी अनोखळी महिलेचा खून अज्ञात आरोपीने केल्याची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले.

या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह गुन्हयाचा समांतर तपास सुरू असताना घटनास्थळावरील सिसिटिव्ही फुटेज व डमडाटा काढुन तांत्रीक विश्लेषणाव्दारे तपास करून मृत महिलेची ओळख पटविण्यात आली. तसेच घटनास्थळावर तीन व्यक्ती संशयास्पद रित्या हालचाल करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याने त्यांची तांत्रिक व गुप्तरित्या माहिती काढली. आरोपी मोबाईल बंद करून बिहार राज्यातील बक्सर जिल्हयात पळून गेल्याची माहिती तपासात पोलिसांना मिळाली.

त्यानंतर बिहार राज्यातील जिल्हा बक्सर येथील पोलीस पथक दाखल होऊन बक्सर जिल्हयातील आरवली गावात सापळा रचून नागा यास ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता. मेनकाचा कट रचून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तसेच संपूर्ण घटनाक्रम त्याने पोलिसांना सांगितला आहे.

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने नागा याला पुढील तपासासाठी हिललाईन पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक आरोपीला हिललाईन पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बापलेक अजून फरार असून पोलिस पथक त्यांचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! आयात शुल्क वाढीनंतर आज सर्वात कमी दर; उच्चांकापासून तब्बल 23 हजारांनी स्वस्त; पाहा ताजे भाव

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Sugarcane farmers: नेत्यांच्या साखरसाम्राज्यात अडकले शेतकऱ्यांच्या घामाचे २१८ कोटी; सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे १२८ कोटींची थकबाकी

Firefly Festival: काजवा महोत्सवाची परदेशी पर्यटकांना भुरळ; जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील निसर्गप्रेमी अकोल्यात

Rajat Patidar: ट्रॉफी जिंकताच कॅप्टन रजत पाटीदारचा मोठा खुलासा, हे सगळं आधीच ठरलेलं होतं' म्हणत नेमकं काय बोलून गेला? पाहा..."

SCROLL FOR NEXT