मुंबई

ऐकाल तर नवलच! कर्जतमधील लोभेवाडीत महिलेने दिला तिळ्यांना जन्म...

संतोष पेरणे


नेरळ : कर्जत तालुक्यातील लोभेवाडी येथील माहेरवाशीण असलेल्या गरोदर महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे. नैसर्गिकरीत्या झालेल्या बाळंतपणानंतर त्या तिन्ही बाळांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी नेले आहे. दरम्यान, तिळ्यांना जन्म देणारी 25 वर्षीय माता आणि तिची तिन्ही बाळे सुखरूप आहेत.

कर्जत तालुक्यातील कशेळे जवळील लोभेवाडी येथील आदिवासी मुलीचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. आदिवासी समाजाचे असलेल्या त्या मुलीला मुरबाड तालुक्यातील ब्राम्हण गावी दिले आहे. महिला गरोदर असल्याने आणि तिचे पहिले बाळंतपण असल्याने तिला माहेरी लोभेवाडी येथे आणण्यात आले होते. 22 जुलैला मंजुळा पंढरीनाथ घुटे या महिलेला बाळंतपणासाठी कशेळे ग्रामीण रुग्णालयाने कर्जत येथे जाण्यास सांगितले. कर्जत शहरातील डॉ. परांजपे यांच्या मातोश्री नर्सिंग होम असून, त्या ठिकाणी बाळंतपण करण्यासाठी दाखल करण्यात आले.

 तेथील डॉ. लता यांनी त्या महिलेचे नैसर्गिकरीत्या बाळंतपण करून माता आणि त्या गरोदर महिलेच्या उदरातील बाळांचा जन्म सुखरूप करून घेतला; मात्र महिलेने जुळ्या नाहीतर तिळ्यांना आणि तोदेखील नैसर्गिक बाळंतपण ही मोठी आश्चर्य असलेली बाब तेथे घडली. लॉकडाऊनमध्ये कुठेही दवाखाने उघडे नसताना कर्जत शहरातील मातोश्री रुग्णालयाने जबाबदारीने त्या गरोदर महिलेचे यशस्वी बाळंतपण करून त्या महिलेला तीन बाळांची माता बनविले आहे. त्यातील पहिले बाळ हे सायंकाळी 5 वाजून 11 मिनिटांनी तर दुसरे बाळ 5 वाजून 28 मिनिटांनी आणि तिसरे बाळ 5 वाजून 33 मिनिटांनी जन्मले आहे. परंतु एकदम तीन बाळ जन्माला आल्याने त्यांची प्रकृती स्थिर राहावी म्हणून मातोश्री नर्सिंग होमच्या डॉक्टरांनी तत्काळ त्या तिन्ही बाळांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेतला.

आज जन्मानंतर तीन दिवसांनी तिन्ही बाळे सुस्थितीत असून त्या तीन बाळांमध्ये दोन मुली आणि एक मुलगा यांची वजनेदेखील चांगली आहेत. त्यामुळे दोन दिवस काचेच्या पेटीत ठेवल्यानंतर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात माता आणि तिन्ही बाळे ठणठणीत झाली आहेत.

---------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT