cricket special train esakal
मुंबई

India Vs Australia : मुंबईतील क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! तीन क्रिकेट स्पेशल ट्रेनची घोषणा

सीएसएमटी, मुंबई सेंट्रल आणि बांद्रा टर्मिनस सुटणार क्रिकेट स्पेशल ट्रेन.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे हा सामना बघण्यासाठी अहमदाबाद जाणाऱ्या क्रिकेट प्रेमींची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक आणि पश्चिम रेल्वेने दोन अशा तीन क्रिकेट स्पेशल ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईतील क्रिटेक प्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.

वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना रविवार, १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ अंतिम फेरीत सामना होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी मुंबईसह देशभरातून क्रिकेट प्रेमी अहमदाबादमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबईतून अहमदाबाला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहे.

त्यामुळे मुंबईतील क्रिकेट चाहत्यांची गैरसोय लक्षात मध्य आणि पश्चिम रेल्वेने शनिवारी क्रिकेट स्पेशल गाडी चालविण्याची घोषणा केली आहे. शनिवारी रात्री या तीन क्रिकेट स्पेशल ट्रेन सीएसएमटी,मुंबई सेंट्रल आणि बांद्रा टर्मिनस हून अहमदाबादकरिता रवाना होणार आहे.. या स्पेशल गाडयांचे आरक्षण शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे.

पहिली क्रिकेट स्पेशल ट्रेन -

ट्रेन क्रमांक ०११५३ सीएसएमटी -अहमदाबाद स्पेशल एक्सप्रेस शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता सुटून अहमदाबादला रविवारी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ट्रेन ०११५४ अहमदाबाद-सीएसएमटी विशेष ट्रेन रविवारी रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी सुटून सीएसएमटीला दुसर्‍या दिवशी सोमवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी येणार आहे. या ट्रेनला सीएसएमटी, दादर, ठाणे, वसई, सुरत, वडोदरा, अहमदाबाद स्थानकात थांबा दिला आहे.

दुसरी क्रिकेट स्पेशल ट्रेन -

ट्रेन क्रमांक ०९००१ वांद्रे टर्मिनस- अहमदाबाद स्पेशल ट्रेन शनिवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक ०९००२ ट्रेन सोमवारी पहाटे ४ वाजता सुटून दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. या ट्रेनला बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा स्थानकावर थांबा दिला आहे.

तिसरी क्रिकेट स्पेशल ट्रेन -

ट्रेन क्रमांक ०९०४९ मुंबई सेंट्रल - अहमदाबाद स्पेशल ट्रेन शनिवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८. ४५ वाजता अहमदाबादला पोहोचेल.परतीकरिता ट्रेन क्रमांक ०९०५० ट्रेन सोमवारी सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुटून दुपारी २ वाजून १० मिनिटांनी मुंबई सेंट्रलला पोहोचेल.या ट्रेनला बोरिवली, वापी, वलसाड, सुरत, भरूच आणि वडोदरा स्थानकात थांबा दिला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT