मुंबई

चहामध्ये गांडूळ तर जेवणात माशी; क्वारंटाईन सेंटरमधील गैरकारभार चव्हाट्यावर

रविंद्र खरात (बातमीदार-कल्याण )

कल्याण : कोरोना बाधित आणि संशयित रुग्णांसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने  'टाटा आमंत्रा' येथे क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे.  तेथील रुग्णांच्या चहाच्या कपात गांडूळ आणि जेवणातील डाळमध्ये माशी सापडल्याचा व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. टाटा आमंत्रा या क्वारंटाईन सेंटर मध्ये दाखल असलेल्या संशयित रुग्णांनीच हे व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमांवर अपलोड केले आहे. या व्हिडीओ आणि फोटोंनी एकच खळबळ उडाली आहे. तसेच क्वारंटाईन सेंटरच्या प्रशासनाविरोधात संतापाची लाट आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने कल्याण भिवंडी बायपास  रस्त्यावरील  टाटा आमंत्रा येथे कोरोना बाधित आणि संशयित असे साधारण दोन हजार रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी रुग्णांनी समाजमाध्यमांवर केल्या आहेत.

क्वारंटाईन सेंटरमध्ये अनेक ठिकाणी  जागो जागी कचरा आणि पीपीई किट्स पडून असतात. शुक्रवारी सकाळी एका रुग्णाच्या चहामध्ये गांडूळ आणि एकाच्या जेवणात असलेल्या डाळीमध्ये माशा सापडल्याच्या फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली आहे .

एकीकडे कोरोना लागण असल्याची भीती किंवा हायरिस्क कॉन्टॅक्टची भीत रुग्णांमध्ये असते. त्यामुळे त्यानंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले जाते. दूसरीकडे टाटा आमंत्रा सारख्या क्वारंटाईन सेंटरमध्ये चाललेला गैरकारभार पाहता  कसे जगायचे असा सवाल तेथील रुग्ण विचारत आहेत. यादिवसांमध्ये प्रतिकार क्षमता वाढवणे तसेच सकारात्मक वातावरण राहणे महत्वाचे असताना, उलट क्वारंटाईन सेंटरमधील गैरसुविधा रुग्णांच्या अडचणींंमध्ये वाढ करीत आहेत. 

रुग्णांनी या समस्या मांडण्यासाठी समाजमाध्यमांचा आधार घेतला आहे,. या माध्यमातून लवकरात लवकर समस्या दूर करा अशी मागणी  जोर धरू लागली आहे .

प्रशासनाचाही वेंधळा कारभार चव्हाट्यावर

कोरोना बाधित रुग्णांच्य़ा संपर्कात आलेल्या इतर नातेवाईक किंवा लोकांचे स्वॅब घेण्यात येतात. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात येते. परंतु त्यांचे रिपोर्ट यायला आट ते दहा दिवस लागत आहे. अशाने ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झालेली नसेल, त्यांनाही अशा परिस्थितीत कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क केला असता, जेवनावच्या समस्या आमच्या पर्यंत पोहचल्या आहेत. ठेकेदारात बदल करण्यात आला आहे. नवीन ठेकेदाराला जेवणात सुधारणा करण्याच्या योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिका सचिव संजय जाधव यांनी दिली आहे.

-----------------------------------------------------------

 संपादन - तुषार सोनवणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT