मुंबई

"बडा बनो, बडी सोच रखो"; मुंबईतून बाहेर न्यायला बॉलीवूड ही काही पर्स नाही - योगी आदित्यनाथ

कृष्ण जोशी

मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबईतील राजकीय वातावरण ऐन थंडीत पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळतंय. याला कारण ठरतंय ते म्हणजे योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा. एकीकडे योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन एकही मराठी माणसाला किंवा उयोजकांना भेटले नाहीत. यावरून महाराष्ट्रात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद विविध प्रशांवर उत्तर दिलंय.   

बॉलीवूड किंवा येथील अन्य कुठलीही गोष्ट न्यायला मी आलो नाही. येथून बाहेर न्यायला 'बॉलीवूड' ही काही पर्स नाही. माझ्या दौर्‍याला विरोध करणार्‍यांनी खरोखर मोठे व्हावे आणि व्यापक विचार करावेत असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज यांनी आज येथे लगावला.

उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणूक व्हावी यासाठी मुंबई दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज विविध उद्योजक तसेच चित्रपटसृष्टीशी संबंधित तज्ज्ञांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र यामध्ये एकही मराठी माणसाला योगी भेटले नाहीत. योगी आदित्यनाथ बॉलिवूडला उत्तर प्रदेशात नेत असल्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोध केला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी राऊतांना टोला लगावला. 

"कोई किसी चीज को लेके नही जा सकता, ही खुली स्पर्धा आहे". सुरक्षाव्यवस्था, व्यवस्थित सोयी, भेदभावविरहित चांगले वातावरण, अशा सोयी आम्ही उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीला देऊ. मुंबईची फिल्मसिटी आपले काम करेल. सध्याच्या चित्रपटसृष्टीच्या नव्या गरजा, नवे अनुभव लक्षात घेऊन उत्तर प्रदेशातील प्रस्तावित नवीन फिल्मसिटी काम करेल, तज्ञांच्या सल्ल्याने यासंदर्भातील मॉडेल तयार करू, जागतिक दर्जाची फिल्मसिटी तयार करण्यासाठी आम्ही चर्चा केली आहे. मी येथे अत्यंत शुद्ध हेतूने आलो आहे असेही ते म्हणाले.

yogi aadityanath press conference and his statement on taking bollywood to UP

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

Weather Update: उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा; तापमानात घट, पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज

School Safety Issue: उटवदच्या जिल्हा परिषद शाळेसमोर 133 केव्ही तारा; 250 विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका, वारंवार निवेदनांनंतरही महावितरणचे दुर्लक्ष

Jalna Tragedy: सावंगी तलाव येथे १० वर्षीय साईनाथचा सर्पदंशाने मृत्यू; वेळेवर उपचार न मिळाल्याने ग्रामस्थांचा रुग्णालयासाठी आक्रोश

SCROLL FOR NEXT