Mumbai sakal
मुंबई

सुरक्षित समाजनिर्मिती करण्यात आपण अपयशी, न्यायालयाची खंत

अत्याचाराच्या घटनांमुळे न्यायालयाची खंत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अल्पवयीन मुलांसोबत झालेल्या लैंगिक (Sexual) गैरवर्तणुकीला वेळीच समजू शकणाऱ्या आणि त्यांना सुरक्षित वातावरण देणाऱ्या समाजाची निर्मिती करण्यात आपण कमी पडत आहोत, अशी खंत मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) व्यक्त केली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन पुतणीला अश्लील मेसेज (Messege) पाठवून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या काकाला जामीन देण्यास नकार देताना उच्च न्यायालयाने (High Court) वरील खंत व्यक्त केली.

२०१८ साली औरंगाबाद येथील आरोपी गौरव नारखेडे याने पुण्यात राहणाऱ्या पीडित मुलीबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तो तिला नेहमी मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवत होता.

गौरव हा काका असल्यामुळे मुलीने ही बाब घरी कोणाला सांगितली नाही; मात्र ही बाब पीडितेने मैत्रिणीला सांगितली. मैत्रिणीने पीडितेच्या आईला ही बाब सांगितल्यानंतर मुलीला त्याबाबत विचारले. त्यावेळी तिने काकाने केलेल्या गैरकृत्याबाबत सांगितल्यानंतर गेल्या वर्षी बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली होती. घटनेनंतर तीन महिन्यांनी मुलीच्या आईने मुलीच्या काका गौरव नारखेडे विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. प्रकरणात अटक झाल्यानंतर या आरोपीने न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मेसेज पाठविणे गैर आहे. पण आत्महत्या हा यावर उपाय नव्हता, इतर मार्ग होत, असा युक्तिवाद आरोपीकडून करण्यात आला; मात्र न्या.

भारती डांग्रे यांनी हा युक्तिवाद अमान्य केला आणि आरोपीचा जामीन नामंजूर केला. न्यायालयाचे निरीक्षण मुलगी पौगंडावस्थेत होती, काका हे वडिलांप्रमाणे असतात. तरीही आरोपीने असे कृत्य केले. त्यामुळे तिची शारीरिक, मानसिक, सामाजिक मनस्थिती बिकट झाली. या वयात असे अनुभव येऊन तिचे भविष्य चिंतीत झाले होते. काका असल्यामुळे कोण विश्वास ठेवणार, अशी भीती तिला वाटली असणार आणि त्यातून तिने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : मिठाई विकत घेण्याआधी हा व्हिडिओ पाहा ! आवडीने कचोरी विकत घेतली, घरी जाऊन पॅकेट उघडून पाहिले तर... धक्कादायक प्रकाराने खळबळ

Heat Risk : शहरी भागात उष्णतेचा धोका वाढला! ‘हीट एक्स्पोजर’मध्ये १५७ टक्क्यांनी वाढ; आयआयटीएमचा अहवाल

JOB IN TEAM INDIA : वैभव सूर्यवंशीसोबत काम करण्याची संधी! भारतीय संघात ५ पदांसाठी भरती; BCCIने मागवलेत अर्ज, करा अप्लाय

Marathi News Live Updates : राज्याचे आरोग्यमंत्री अमरावतीत दाखल, डफरिन रुग्णालयाची करतायेत पाहणी

Numerology: Love Marriage की Arranged? 'या' ३ मूलांकांच्या लोकांचे जुळतात सर्वाधिक प्रेमविवाह; जाणून घ्या जन्मतारखेत दडलेलं लग्नाचं रहस्य!

SCROLL FOR NEXT