मुंबई

गर्लफ्रेंडसमोरच घेतली खाडीत उडी; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

रशिद इनामदार

नवी मुंबई : किरकोळ वादातून एका तरुणाने प्रेयसीसमोरच वाशी खाडी पुलावरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. वाशी पोलिसांनी वेळीच स्थानिक मच्छीमारांच्या साहाय्याने बुडणाऱ्या तरुणाला बाहेर काढल्याने तो बचावला आहे. दरम्यान, वाशी खाडी पुलावर रात्री घडलेल्या या प्रकारानंतर तरुणाच्या प्रेयसीने खाडी पुलावर रडारड सुरू केल्याने, बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 
तरुणाचे नाव रवी पप्पू रेड्डी (21) असे असून तो व प्रेयसी (20) मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमध्ये राहतात. मंगळवारी रात्री ते दोघे दुचाकीवरून वाशीमध्ये फिरण्यासाठी आले होते. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास मानखुर्द येथे परततांना, त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यामुळे रवीने वाशीतील नवीन पुलावर मध्यभागी दुचाकी उभी केली आणि रागाच्या भरात खाडीत उडी मारली. 

या प्रकारानंतर रवीच्या प्रेयसीने खाडी पुलावर रडारडी सुरू केल्याने काही वाहनचालकांनी पोलिसांना कळवले. वाशी पोलीस ठाण्यातील बीट मार्शल पोलीस नाईक खोत, होमगार्ड पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छीमार महेश सुतार याला बोलावून अभिषेक जैस्वाल याच्यासह अंधारात वाशी खाडीत तरुणाचा शोध घेतला. यावेळी रवी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मच्छीमार आणि पोलिसांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. 

त्यानंतर पोलिसांनी रवी रेड्डी आणि त्याच्या प्रेयसीला पोलीस ठाण्यात आणून समुपदेशन केले. त्यानंतर दोघांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली. 

वाशी खाडी पुलावरून उडी टाकणाऱ्या अनेक तरुण-तरुणी व महिलांना वाशी पोलिसांनी या पूर्वी वाचवले आहे. 5 जानेवारी रोजी वाशी खाडी पुलावर मित्र मैत्रिणींसह रात्रीच्या सुमारास फिरण्यासाठी आलेल्या संतोष गजधाने (28) या तरुणाने देखील आपल्या मित्र मैत्रिणींसमोर वाशी खाडी पुलावरुन उडी टाकली होती. पोलिसांना अद्याप तो अथवा त्याचा मृतदेह सापडला नाही. पोलिसांकडून अद्याप त्याचा शोध घेण्यात येत आहे. 

a young man tried to jumping from the Vashi Bay bridge in at vashi bridge

---------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT