Crime News sakal
नांदेड

Crime News : धार्मिक व जातीय विषयांवरून लोकांना भडकवणाऱ्या पाच नेटकऱ्यांवर गुन्हा दाखल

ऐन निवडणुकीमध्ये धर्माच्या नावावर भावना भडकविणाऱ्या पाच असामाजिक तत्त्वांवर नांदेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. धार्मिक व जातीय विषयांवरून लोकांची माथी भडकवणाऱ्या या गुन्हेगारांवर जिल्ह्याच्या पाच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nanded : ऐन निवडणुकीमध्ये धर्माच्या नावावर भावना भडकविणाऱ्या पाच असामाजिक तत्त्वांवर नांदेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. धार्मिक व जातीय विषयांवरून लोकांची माथी भडकवणाऱ्या या गुन्हेगारांवर जिल्ह्याच्या पाच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.

निवडणुकीमध्ये जात, धर्म, पंथ याचा वापर करू नये, अशी आदर्श आचारसंहिता आहे. मात्र, ऐन निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने काही पोस्ट तयार करणाऱ्या पाच जणांना सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने शोधून काढले आहे.

माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या अंतर्गत ही समिती कार्यरत कार्यरत आहे. धर्माच्या नावावर भावना भडकविणाऱ्यावर हिमायतनगर, मुखेड, अर्धापूरला दोन आरोपी, माहूरला दोन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये, यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांचे नाव जाहीर केले नसल्याचे सांगितले आहे.

निवडणुका जाहीर झाल्यापासून पाच जणांवर गुन्हे दाखल झाले असून पाच जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तथापि, तरुणांनी निवडणुक काळामध्ये जाती धर्माच्या नावाने येणाऱ्या कोणत्याही पोस्ट एकमेकांना फॉरवर्ड करू नये.

कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवर आल्यानंतर अफवा पसरविण्यापेक्षा थेट माहिती नांदेड पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

शहरात सण,उत्सवाचा व निवडणुकीचा काळ असताना काही समाजकंटक हेतूपुरस्सर अशा पोस्ट टाकतात. काही पोस्ट या जुन्या असतात, तर काही कुठल्या अन्य राज्यातील असतात. त्यामुळे अशा कुठल्याही पोस्टमुळे तणाव निर्माण होणार नाही यासाठी नागरिकांनी जागृत असावे. आपल्या घरातील तरुणांना यापासून दूर ठेवावे. कोणत्याही पोस्टवर मत बनवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

थेट संपर्क साधा..

आक्षेपार्ह काही पोस्ट आढळल्यास समाज माध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची, संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने ८३०८२७४१०० हा क्रमांक दिला असून यावर अशा पद्धतीने काही आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT