nanded sakal
नांदेड

Nanded News : चोर सोडून संन्याशावर कारवाईची कुऱ्हाड!

अन्न औषध प्रशासनाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

हिमायतनगर : येथे गेल्या सोमवारी परमेश्वर मंदिर परिसरात ठिकठिकाणी धाडी टाकून पानपट्टी धारक, किरकोळ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. दंडही आकारण्यात आला. एक बाब विशेष अशी की, शहरात दोन मोठे घाऊक विक्रेते आहेत. हे जगजाहीर असतांना, या मोठ्या विक्रेत्यांना सोडून किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून प्रशासनाने फुशारकी मारून घेतली असल्याची चर्चा शहरात चवीने केली जात असून, प्रशासनाच्या कारवाईत चोर सोडून सन्याश्याला फाशी दिल्या गेली असल्याने संतप्त प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. शहरातील नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारण्याचाही प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमावाला शांत केले.

हिमायतनगर शहर हे गुटख्याचे माहेरघर म्हणून सर्वदूर परिचित आहे. येथूनच जवळपास इतर जिल्ह्यात गुटखा पार्सल होत असतो. येथे दोन घाऊक विक्रेते असून यांच्याकडून दररोज लाखो रूपयाचा गुटखा आयात व निर्यात केला जातो. हे आता लपून राहिलेले नाही. दिवाळीनंतर अन्न व औषध प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. परंतू आश्चर्याची बाब अशी ठरते की, कारवाईत खरे मोठे विक्रेते जाणीवपूर्वक अर्थपुर्ण व्यवहारानंतर बाजूला फेकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात टक्केवारीवरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांचा राडा; महापालिकेत शिवीगाळ आणि गोंधळ, VIDEO VIRAL

Who is Malad Fake Baba? मुंबईत भोंदूबाबाचा अघोरी प्रताप! अंगात देवी येते सांगून काढायचा 'भूत'; साहित्याची यादी पाहून तुम्हीही हादरून जाल

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

TCS AI Project: TCS सोबत योगी सरकारचा युपीमध्ये मोठा प्लॅन! AI क्रांतीमधून हजारो जॉब्सची निर्मिती

CSK ने RCB विरोधात ठोठावलं BCCI चं दार, दाखल केली तक्रार; पण असं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT