कोरोना योद्ध्यांसाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा पुढाकार 
नांदेड

कोरोना योद्ध्यांसाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - कोरोनाच्या फ्रंटलाइनवर कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने मागील आठवड्यात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर झालेल्या पहिल्या शिबिराच्या यशस्वितेनंतर नांदेड केंद्राने पुढाकार घेऊन शिबिराचे आयोजन केले होते, यात महाराष्ट्रातील १८३ पोलिसबांधव व वैद्यकीय क्षेत्रातील ८९ अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्रित सहभाग नोंदवला होता.

शिबिर ऑनलाइन सेवाभावनेतून विनामूल्य
श्री. रविशंकर यांच्या मानव कल्याणाच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या शिबिरात कोरोनाच्या फ्रंटलाइनवर कार्यरत असलेल्या कोरोना योद्धांसाठी विविध क्षेत्रातून कार्य होत आहे. या शिबिरात श्वासाच्या माध्यमातून सूक्ष्म जीवन ऊर्जाशक्ती कशी वाढवावी. विपरीत परिस्थितीतही स्वतःचे मनोबल कसे टिकवून ठेवावे? या साठीचे तंत्र व शास्त्र प्रात्यक्षिकांसह दिले जात आहे. हे शिबिर ऑनलाइन असून सेवाभावनेतून विनामूल्य घेतले जात आहे. या शिबिराचा फायदा आपापल्या घरी बसून प्रशिक्षणार्थी अनुभवत आहेत.

राज्यभरातून पोलिस सहभागी
मागील आठवड्यात हे शिबिर नांदेड येथे दोन उपकेंद्रावर पोलिसांसाठी व एका उपकेंद्रावरून वैद्यकीय सेवेत असलेल्यांसाठी आयोजित केले होते. त्यात महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, जळगाव, बुलढाणा, हिंगोली, श्रीगोंदा, पुणे सिटी, तळेगाव दाभाडे, धुळे, पाटोदा बीड, अभोना, नांदेड, साताना, आष्टी व इतर ठिकाणाहून पोलिसबांधव सहभागी झाले होते. शिबिरात माया अत्रे, माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण हिवरेकर, सतीश काळे, राजेश्वर भुरे, अंजली विजापुरे, वर्षा हिवरेकर या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

आमचा श्वास झाला मोकळा 
शिबिरार्थी व मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक दुधे (आयपीएस) यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, “कोरोनामुळे आमचे शरीर जाम झाले होते. धकाधकीच्या जीवनामुळे आमची श्वासाची क्षमता की झाली होती. हे या शिबिरात आल्यावर कळले. यापूर्वी आम्ही कमी प्रमाणात श्वास घेत होतो. आता आमचा श्वास मोकळा झाला आहे. या शिबिराचा नक्कीच आम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास व प्रतिकूल परिस्थितीतही समर्थपणे कार्यरत राहण्यास मदत होणार आहे. हे शिबिर सर्वांनी करावे, असे मला वाटते.”

मनावर येणारे दडपण हळुवारपणे दूर झाले
जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदेश जाधव म्हणाले की, “आम्ही शरीराचे डॉक्टर पण वैद्यकीय सेवा देताना मनावर येणारे दडपण हळुवारपणे दूर कसे करावे, याचे मानसशास्त्र या शिबिरातून प्राप्त झाले.” या वैद्यकीय कार्यशाळेत नांदेड येथील सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके, अधीक्षक डॉ. लखमवार, डॉ. ए. एन. खंदारे, डॉ. तोटावार या अधिकाऱ्यांनीही शिबिराचा अनुभव घेतला.

पुढील शिबिराची नोंदणी सुरू 
या शिबिराच्या यशस्वितेसाठी सुधाकर टाक, महेश भुरे, रूपेच टाक, सचिन भायेकर, अरुणा भुरे यांनी परिश्रम घेतले तर, तंत्रसहाय्य शशांक भुरे व सुदर्शन देशपांडे यांनी केले. महाराष्ट्रभरातील विविध ठिकाणाहून आर्ट ऑफ लिव्हिंग नांदेड केंद्राच्या या पुढाकाराला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त करत पुढील शिबिराची नोंदणी सुरू आहे. यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन माध्यम समन्वयक गोविंद जोशी यांनी केले आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kharadi Accident : पुण्यात भीषण अपघात ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, तरुणासह चिमुकला ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Whatsapp Update : व्हॉट्सॲपमध्ये येतय नवीन ‘स्कॅम अलर्ट’ फीचर; फसव्या मेसेजचा लगेच मिळणार अलर्ट, पाहा कसं वापरायचं?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT