rahul gandhi bharat jodo yatra sakal
नांदेड

Bharat jodo yatra : अन् तिथेच राजीव गांधींना वाहिली आदरांजली

नरसी फाट्यावर भावूक वातावरण, त्यावेळच्या आठवणींना गावकऱ्यांकडून उजाळा

अतुल पाटील : सकाळ वृत्तसेवा

नायगाव (जि. नांदेड) : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी ज्या नरसी फाट्यावर महाराष्ट्रातील शेवटची सभा झाली होती, त्याच ठिकाणी आज (ता. ९) सकाळी त्यांचा मुलगा तथा कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वडिलांना आदरांजली वाहिली. दरम्यान, काहीकाळ याठिकाणी भावूक वातावरण झाले होते.  जुन्या लोकांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला.

महाराष्ट्रातील तिसऱ्या दिवसाची भारत जोडो यात्रेची सुरवात शंकरनगर येथून सकाळी साडेसहाला सुरवात झाली. किनाळा, हिप्परगा याठिकाणी स्वागत स्विकारत यात्रा साडेसात वाजता नरसीमध्ये पोचली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक थांबले होते. पदयात्रेत ठिकठिकाणी स्वागत व्यासपीठ उभी केलीत तसेच, नरसी फाटा या चौकातही छोटेखानी व्यासपीठ उभे केले होते. व्यासपीठावर (स्व.) पंतप्रधान राजीव गांधी आणि (स्व.) माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. नरसी फाट्यावर राहुल गांधी पोचल्यानंतर त्यांनी दोन्ही प्रतिमांना पुष्प अर्पण केले. दरम्यान, काहीकाळ भावूक वातावरण झाले. लगेच यात्रा नायगावकडे मार्गस्थ झाली.

नरसी फाट्यावरुन यात्रा नायगावकडे येत असताना आठच्या दरम्यान, राहुल गांधी यांनी नुरी फंक्शन हॉल येथे सकाळचा नाष्टा केला. साडेआठ वाजता त्यांनी पुन्हा यात्रेला सुरवात केली. यावेळी काही नागरिकांनी कोळी बांधवांच्या वेशात राहुल गांधींची भेट घेतली. दुतर्फा उभे असलेल्या एका मुलाने भेटायची इच्छा व्यक्त केली तर, त्या मुलाला सोबत घेऊन चालत त्याची विचारफूस केली. खैरगाव, नायगाव याठिकाणी रस्त्याच्या कडेला शेकडो लोक होतेच. त्याशिवाय नऊवारी साडीत लहान मुलींनी लेझीम सादरीकरण केले. तर, काही विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर करत राहुल गांधींचे स्वागत केले. वयस्क महिला तर, इंदिराचा नातू बघायला मिळावा म्हणून पदयात्रेत पाच-सहा किलोमीटरची पायपीट करत नायगावपर्यंत आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Scheme: गर्भलिंग निदानाची माहिती द्या एक लाख मिळवा; स्त्रीभ्रूण हत्यांना आळा घालण्यासाठी सरकारचे पाऊल, काय आहे खबरी योजना?

Pimpri Chinchwad: अतिक्रमणांचा विळखा; कारवाई कागदोपत्रीच, रुपीनगर अंकुश चौक मार्गाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : नाशिक- पुणे महामार्गावर सुरू असलेले हिंदू संघटनांचे ठिय्या आंदोलन मागे

Mumbai News: कलिना विद्यापीठाच्या जागेचे सीमांकन करा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेत सत्तेचे समीकरण बदलणार? स्थायी समिती सभापतिपदासाठी बुधवारी चुरस

SCROLL FOR NEXT