nanded sakal
नांदेड

Nanded Crime News : विद्यार्थ्याला ठार मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी

वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : दोन जणांनी संगनमत करून एका विद्यार्थ्याला ठार मारण्याची धमकी देऊन पाच हजार रूपये खंडणीची मागणी केली आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दिलीपसिंग कॉलनीतील जलाराम मंदिर येथे अनुराग नंदलाल जाट (वय १५, रा. अमली, ता. हरीमगड, जि. भिलवड, राज्यस्थान हल्ली मुक्काम जलाराम मंदीर, नांदेड) यास ता. १२ ऑक्टोंबर ते ता. दहा डिसेंबर दरम्यान, दिलीपसिंग कॉलनी येथील जलाराम मंदीर येथे दोन आरोपितांनी संगनमत करून धमकी दिली.

मागील दोन महिन्यांपासून खंजरने मारण्याची धमकी देऊन खर्चासाठी पाच हजार रुपये पैशांची मागणी केली. त्याच्या भीतीपोटी अनुरागने घरी जाऊन आईच्या लॉकरमधून वेळोवेळी दोन हजार रूपये काढून दिले.

त्यानंतर देखील ता. दहा डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास अनुराग हा जलाराम मंदीर येथे जात असताना तेथे या दोन आरोपींनी त्याला भेटून खंजर दाखवून घरी जाऊन पाच हजार रूपये घेऊन ये, नाहीतर तुला ठार मारतो, अशी धमकी दिली. त्यामुळे या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक मंठाळे पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT