nanded sakal
नांदेड

Nanded News : धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट नको

हिमायतनगरला आदिवासी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

हिमायतनगर : महाराष्ट्रातील धनगर समाजाला मुळ आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आदिवासी समाजाचा विराट मोर्चा बुधवारी (ता.१३) रोजी तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात महिला, मुली, तरूणांसह मोठ्याप्रमाणात आदिवासी समाजाचा सहभाग होता.

श्री परमेश्वर मंदिरापासून प्रारंभ झालेल्या मोर्चात धनगर जात व इतर कोणत्याही जाती समुहाला मुळ आदिवासी अनुसूचित जमातीत समावेश करण्यात येवू नये, धनगर समाजाला आदिवासीच्या सवलती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली सुधाकर शिंदे समिती तत्काळ रद्दबातल करण्यात यावी. या सह अन्य मागण्यांसाठी मुळ आदिवासी समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय वाळके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी.डी. गायकवाड, सत्यवृत्त ढोले, डाॅ. संजय धुमाळे, रामदास वाळके, गजानन बुरकले, आर.जी. बोडके, विश्वंभर वानोळे, मारोती बेले, मारोती गवले, रामदास भडंगे, पुंडलीक तरटे, अभिषेक खुपसे, रामराव भिसे, वसंतराव डवरे, दत्ता काटमोडे, डाॅ. मारोती वाकोडे, संजय मांजरमकर आदींसह महिला, पुरूषांनी मोर्चात सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT