Dharmabad first time Municipal general election reservation declared
Dharmabad first time Municipal general election reservation declared sakal
नांदेड

नांदेड : अनेकांना लॉटरी तर काही जणांचा हिरमोड

सुरेश घाळे

धर्माबाद : धर्माबाद नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी आरक्षण सोडतीनंतर अनेकांना लॉटरी लागली तर काहींचा हिरमोड झाला. आपला प्रभाग सुरक्षित असल्याने आता अनेकजण नव्या दमाने कामाला लागणार आहेत. तर आरक्षणाने संधी हुकलेले नव्या प्रभागांच्या शोधात आहेत. आता सर्वांना उत्सुकता आहे ती निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची. पहिल्यांदाच धर्माबाद पालिकेची सार्वत्रिक निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. त्याप्रमाणे पालिका क्षेत्रांतर्गत ११ प्रभाग तयार करण्यात आले. ११ प्रभागात प्रत्येकी दोन असे २२ सदस्य पदाधिकारी असणार आहेत.

पूर्वी १९ होते, पालिकेच्या ११ प्रभागातील २२ जागांसाठी सोमवारी सकाळी ११ वाजता नगरपालिकेसमोर उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांच्या उपस्थितीत शहरातील जिल्हा परीषद शाळेतील इयत्ता तिसरी वर्गातील विद्यार्थीनी अंकाक्षा संदीप वाघमारे हिच्या हाती आरक्षण सोडतीची चिट्ठी काढण्यात आली. त्यात ११ जागा महिलांसाठी राखीव तर ११ जागा सर्वसाधारण आहेत. अनुसूचित जातीसाठी चार जागा राखीव असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीच्या तीन जागा राखीव असून त्यात दोन जागा महिलांसाठी राखीव आहे.

प्रत्येक प्रभागात एक जागा महिलेसाठी आणि एक जागा सर्वसाधारण आहे. आता आपला नंबर लागेल असा विश्वास इच्छुकांना होता. मात्र ५० टक्के महिला आरक्षणामुळे तब्बल ११ महिलांना पालिकेवर संधी मिळणार आहे. प्रभाग रचनेनुसार अनेक जण कामाला लागून गाठीभेटी वाढविल्या होत्या. आपणच उमेदवार राहील असा अनेकांनी मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला होता. परंतु जाहीर आरक्षणानुसार त्या जागेवर महिला विराजमान होणार असल्याने इच्छुकांची चांगलीच गच्छंती झाली. तरीही पाच वर्षांनी आलेली संधी सोडायची नाही या निश्चयाने घरच्या सौभाग्यवतीला किंवा घरच्याच महिलेला निवडणुकीत उमेदवार करण्याचा बेत केला जात आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेकांना लॉटरी लागली तर काहींचा हिरमोड झाला.

आपला प्रभाग सुरक्षित असल्याने आता अनेकजण राजकीय पक्षाचा संपर्क करीत आहेत. पक्षाचे तिकीट मिळाले नाही तर बंडखोरीची तयारी काहींची आहे. तर आरक्षणाने संधी हुकलेले नव्या प्रभागांच्या शोधात असून तेथे नव्याने तयारी करावी लागणार आहे. ओबीसींना आरक्षणात स्थान नसल्याने त्यांना सर्वसाधारण प्रवर्गातूनच उभे राहावे लागणार आहे. पालिका सदस्य पदाचे आरक्षण जाहीर झाले; परंतु अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होणे बाकी असल्याने, पालिकेचा कारभारी कोण होणार? याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.

सौभाग्यवतीच्या नावानं चांगभलं

एक दीड वर्षापासून पालिकेचे पदाधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या इच्छुकांचा आरक्षण जाहीर झाल्यानंतर भ्रमनिरास झाला. कारण मतांची गोळाबेरीज केलेल्या नेमक्या जागीच महिला आरक्षण झाले. तरीही त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्या सौभाग्यवतींना पुढे करून त्यांच्या नावानं चांगभलं करण्याचा मनसुबा इच्छुक आखत असल्याची चर्चा होत आहे. आता आरक्षण सोडत झाल्यानंतर इच्छुकांच्या नजरा निवडणूक तारखेकडे लागले आहे. आता खऱ्या अर्थाने शहरात राजकीय वातावरण तापणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

DC vs MI, IPL : दिल्लीकडून आजपर्यंत कोणालाच जमला नव्हता, तो विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने एकदा नाही तर दोनदा करून दाखवला

Fact Check : चीनमधला पूल मुंबईचा सांगून '४०० पार' चा दावा; फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update: भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदांचा विरोधकांवर हल्लाबोल

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

SCROLL FOR NEXT