nanded  sakal
नांदेड

Nanded News : जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप

कामे खोळंबली : जिल्हाभरातील कर्मचारी संपावर; ढोल बजावो आंदोलन

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

नांदेड : ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून (ता. १४) बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये जिल्ह्यातील जवळपास दोन हजार ५६ कर्मचारी सहभागी झाले असून त्यात महसूल, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य आदी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पहिल्या दिवशी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या संपामुळे दैनंदिन कामे खोळंबली असून अनेकांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. नेहमी गजबजलेले जिल्हाधिकारी कार्यालयात आज शुकशुकाट दिसून येत होता. जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करू नका या व इतर मागण्यासाठी मार्च महिन्यात ऐतिहासिक संप करण्यात आला होता.

सदर संपाच्या फलितार्थ जुनी पेन्शन मिळण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने एक समिती स्थापन करून अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्याची मुदत देण्यात आली होती. परंतु विहित कालावधीमध्ये अहवाल पूर्ण झाला नसल्यामुळे समितीला मुदतवाढ देण्यात आली. मात्र, सदर समितीला तीन महिने मुदत देऊनही समितीने अद्याप अहवाल जाहीर केला नाही. त्यामुळे शासन वेळकाढूपणाचे धोरण अवलंबित आहे. परिणामी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी राज्य सरकारी व जिल्हा परिषद निमसरकारी तथा शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समिती, राज्य चतुर्थ कर्मचारी महासंघ यांच्या माध्यमातून ता. १४ पासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली. त्यानुसार बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे.

या संपामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील सर्व तहसील, पंचायत समिती, आरोग्य विभागातील वर्ग तीन व चारचे कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच जिल्हा परिषद कार्यालयातील वर्ग एक व दोनचे अधिकारी, कर्मचारीही संपावर होते.

जिल्हाधिकारी कार्यालय चालले चौघांवर

जिल्हाधिकारी कार्यालयात एकुण एक हजार ७८ कर्मचारी असून यात पुर्व परवानगीने ७८ जण रजेवर आहेत तर ९९६ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. केवळ चार कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. यात वर्ग तीन व चारच्या कर्मचा-यांचा समावेश आहे. कार्यालयात आज अनेकजण कामासाठी येऊन गेले असून येत्या दोन ते तीन दिवसात पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली.

तर दुसरीकडे जिल्हा परिषद कार्यालयातील ८० कर्मचारी संपात सहभागी झाले असून २५६ उपस्थित तर ३४ पुर्व परवानगीने रजेवर होते. तसेच तालुक्यामध्ये एक हजार ६० कर्मचारी संपात सहभागी झाले असून नऊ हजार ८३१ कर्मचारी कार्यालयात उपस्थित तर पूर्व परवानगीने २१८ जण रजेवर असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT