nitin gadkari 
नांदेड

नितीन गडकरींसोबत शेतकऱ्यांची लवकरच बैठक- प्रताप पाटील चिखलीकर

लोहा शहराच्या पूर्वेकडून जाणाऱ्या वळण रस्त्यासाठी ३४ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. परंतु ग्रामीण भागापेक्षाही या शेतकऱ्यांना त्याचा मावेजा कमी मिळाला.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : लोहा शहराच्या पूर्वेकडून जाणाऱ्या वळण (Highway loha) रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना वाढीव गुणांकप्रमाणे मावेजा मिळाला पाहिजे. त्यांची मागणी रास्त असून या संदर्भात लवकरच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) व लोह्यातील शेतकरी बांधब यांची बैठक होणार असून या सर्व शेतकऱ्यांना मावेजा मिळावा यासाठी मी वचनबद्ध आहे, असा विश्वास जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Mp Chikhalikar) यांनी शिष्टमंडळास दिला. (Farmers- meeting- with- Nitin- Gadkari -soon - Pratap Patil -Chikhlikar)

लोहा शहराच्या पूर्वेकडून जाणाऱ्या वळण रस्त्यासाठी ३४ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. परंतु ग्रामीण भागापेक्षाही या शेतकऱ्यांना त्याचा मावेजा कमी मिळाला. आमदार असताना प्रताप पाटील चिखलीकर यांनी दोन गुणांकप्रमाणे मावेजा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. ती मागणी मंजूर झाली पण मावेजा अद्याप मिळाला नाही. या रस्त्यात शेत- जमिन जाणाऱ्या शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष माणिकराव मुकदम, लक्ष्मराव संगेवार ,शेषराव पाटील चव्हाण यासह प्रमुखांची बैठक झाली.

हेही वाचा - धमकीच्या मेलमध्ये दरमहा पाच कोटी रुपये सुरक्षा कर देण्यासाठी संदेश लिहिलेला होता. हॉटस्पॉटची क्षमता एक किलोमीटर लिहिलेली होती. १० कोटी रुपये आणि दरमहा पाच कोटी रुपये सुरक्षा कर येत राहील तोपर्यंत सर्वकाही गुप्त राहील असेही संदेशात आरोपीने म्हटलेले आहे

जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर याना वाढीव मावेजा मिळेपर्यन्त रस्त्याचे काम बंद आंदोलन सुरु केले. त्या संदर्भाने निवेदन देण्यात आहे. माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक दता वाले, व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण नगरसेवक संभाजी चव्हाण, हायवेचे अभ्यासक राजेश मुकदम, सुधाकर पाटील पवार, सचिन मुकदम, गजानन चव्हाण, संग्राम चव्हाण, पवार यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

शेतकरी शिष्टमंडळाने खा. चिखलीकर यांची भेट घेतली सविस्तर माहिती दिली. प्रतापरावांनी वाढीव गुणांकसाठी केलेले प्रयत्न याची आठवण सांगितली सर्वांच्या समोर ते केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलले. लवकरच या वळण रस्ता बाधित झालेल्या व योग्य मावेजा न मिळालेल्या जमीनधारकांची व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठक होईल त्यात हा मार्ग निकाली निघणार असे या शिष्टमंडळास पाटील यांनी आश्वासित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

Maharashtra Politics : भेटींना राजकीय रंग देऊ नका; महायुती भक्कम असल्याचा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा इशारा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

RBI Rule: बँकेच्या चुकीमुळे तुमचे नुकसान झाले? मग ग्राहकांना मिळू शकते 33 लाखांपर्यंत नुकसान भरपाई; जाणून घ्या नियम

IND vs ENG: विराट मोडणार सचिन तेंडुलकरचा १९ वर्षांचा जुना रेकॉर्ड? जे कोणालाच जमलं नाही ते विराट करणार, पाहा नेमकं काय घडणार

SCROLL FOR NEXT