Ganeshotsav Rules 2022 
नांदेड

Ganeshotsav Rules 2022 : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही

विजय कबाडे; भोकरला सण उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक

सकाळ वृत्तसेवा

भोकर : सध्या सर्वत्र सणासुदीची रेलचेल सुरू आहे. यात प्रामुख्याने गणेशोत्सव, दुर्गादेवी असे महत्वाचे सण उत्सव आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. धार्मिक पंरपरा कायम ठेऊन विधायक कामाला झुकते माप देऊन उत्सव साजरे करावेत, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी मंगळवारी (ता. २३) केले.

येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार राजेश लांडगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रसूल तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे, अधीर कांबळे, सूर्यकांत कांबळे यांची उपस्थिती होती.

श्री. कबाडे म्हणाले की, सण-उत्सव काळात शांतता भंग होऊ नये, म्हणून नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय असावा, यासाठी एकमेकांशी संवाद साधने काळाची गरज आहे. उत्सवास गालबोट लागणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमांची पायमल्ली करणा-यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी शांतता समितीचे सदस्य सुरेखा माळे, पत्रकार बी. आर. पांचाळ, ताहेर बेग, अशोक बेटलींगवार यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस निरिक्षक विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांनी आभार मानले. बैठकीस दुर्गादेवी व गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Farmers: पेरलं, पण उगवलंच नाही! बोगस सोयाबीन बियाण्यांनी हजारो शेतकरी अडचणीत

Sangli Crime : जुन्या खुनाचा बदला घेण्यासाठी सांगलीत 20 वर्षांच्या तरुणाची निर्घृण हत्या; स्वामी समर्थ घाटावर चैतन्य तोरणेवर 8 ते 9 वर्मी घाव; संशयितांच्या घरावर दगडफेक

Latest Marathi News Update : पुण्यात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात

CBSE Three Language Policy: कोणतीही भाषा शिकणं वाया जात नाही, त्रिभाषा धोरणाला स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

Jalgaon Rain Forecast : उत्तर महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा होणार सक्रिय! जळगाव जिल्ह्यात 'या' तारखेपासून वाढणार पावसाचा जोर? 35 ते 40 किमी वेगाने वाहणार वारे

SCROLL FOR NEXT