going to village in diwali festival inform police reduce robbery crime marathi news  esakal
नांदेड

Nanded Diwali Precaution : दिवाळीत गावी जाताय? पोलिसांना कळवा; घरफोड्या टाळण्यासाठी सतर्कतेचे आवाहन

घरफोडी, चोरी होऊ नये, यासाठी पोलिस विभागाने हा अभिनव उपक्रम राबवला

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : दिवाळीची सुटी लागली की सर्वांनाच वेध लागतात ते परगावी जाण्याचे...मात्र, दिवाळीच्या सुटीत गावाला किंवा सहलीवर जाताना आपल्या हद्दीतील पोलिस ठाण्याला माहिती कळवा, असे आवाहन नांदेड पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. घरफोडी, चोरी होऊ नये, यासाठी पोलिस विभागाने हा अभिनव उपक्रम राबवला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिवाळीच्या सुटीमध्ये परगावी किंवा सहलीला जाणाऱ्या नागरिकांना आवाहन केले आहे. आपण आपल्या गावी जात असताना आपल्याकडील सर्व प्रकारचे दागीने, पैसे, मौल्यवान वस्तु या घरी ठेऊ नयेत. त्या एकतर स्वतः सोबत घेऊन जाव्यात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवाव्यात. बंद घरामध्ये मौल्यवान वस्तू ठेऊ नये. गावी जात असताना शेजाऱ्यांना कल्पना देऊन जावे तसेच आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात सुध्दा येऊन माहिती द्यावी. जेणेकरून पोलिस पथक तुमच्या भागात गस्त घालेल.

त्याचबरोबर नागरिकांनी तीन ते पाच घरांनी मिळुन एखादा गुरखा नेमावा. रात्रगस्तवरील पोलीस कर्मचारी यांच्याशी संपर्क साधुन त्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन ठेवावा किंवा डायल ११२ वर कॉल करावा. आपल्या कॉलनी, परिसरातील फेरीवाले, किरकोळ विक्री करणारे आल्यास त्यांचे आधारकार्ड तपासावे. तो व्यक्ती स्वतःची ओळख लपवत असेल तर पोलीसांना संपर्क करावा.

‘डायल ११२’ वर संपर्क साधावा

आपल्या कॉलनी, अपार्टमेंट किंवा परिसरात संशयितरित्या एखादा व्यक्ती फिरत असल्यास तत्काळ डायल ११२ वर संपर्क करावा. गावी जात असताना उच्च प्रतीचे कुलूप दरवाज्यास लावावे किंवा अलार्मसारखी एखादी बेल दरवाज्यास बसुन जावे. गावी जाताना घरातील, परीसरातील लाईट सुरू ठेवावेत, असे आवाहनही पोलिस विभागाने केले आहे.

दिवाळीचा सण आल्यामुळे अनेकजण आपआपल्या गावी किंवा सहलीवर जातात. जाताना आपआपल्या घराला कुलूप लावुन जातात. परंतु सदरील बंद घराचा फायदा घेऊन चोरटे घरफोडी करून सदरील ठिकाणी चोऱ्या करतात. त्यामुळे चोरी, घरफोडी या सारख्या घटना घडू नयेत, यासाठी नागरिकांनी उपाययोजना कराव्यात तसेच पोलिस ठाण्यात माहिती द्यावी.

- श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील 'आरएसएस स्मृती मंदिरा'बाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

SCROLL FOR NEXT