govt job recruitment scam paper leak student akrosh morcha at nanded sakal
नांदेड

Nanded News : सरळसेवा पदभरतीत हाेणाऱ्या गैरप्रकाराविराेधात, नांदेडमध्ये विद्यार्थ्यांचा मंगळवारी आक्रोश महामोर्चा

राज्यातील सद्यस्थितीत विविध कंपनी अंतर्गत सरळसेवा पदभरतीत होत असलेला गैरप्रकार, पेपरफुटीसाठी व खासगीकरणाचे वारंवार अध्यादेश काढणाऱ्या शासनाच्या धोरणाविरोधात तसेच इतर मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २३) नांदेडमध्ये विद्यार्थी आक्रोश महामोर्चा काढणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nanded News : राज्यातील सद्यस्थितीत विविध कंपनी अंतर्गत सरळसेवा पदभरतीत होत असलेला गैरप्रकार, पेपरफुटीसाठी व खासगीकरणाचे वारंवार अध्यादेश काढणाऱ्या शासनाच्या धोरणाविरोधात तसेच इतर मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २३) नांदेडमध्ये विद्यार्थी आक्रोश महामोर्चा काढणार आहेत.

ऑनलाईन परीक्षा विरोधी कृती समितीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. कर्नाटक राज्याच्या धर्तीवर बेरोजगार भत्ता महाराष्ट्रात तत्काळ सुरू करण्यात यावा. राजस्थान व मध्य प्रदेश धर्तीवर परीक्षा शुल्क स्मार्ट कार्ड योजना महाराष्ट्रात राबवून विद्यार्थ्यांची परिक्षा शुल्कामधून होणारी आर्थिक पिळवणूक तत्काळ थांबविण्यात यावी.

एमपीएससीच्या रिक्त पदांची जाहिरात फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रकाशित करण्यात याव्यात. सर्व विभागातील पदभरतीमध्ये कोरोना कालावधीतील दोन वर्षे वयोमर्यादा शिथिलतेची मुदत वाढवून २०२४ पर्यंत संधी देण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात बेरोजगार, महाविद्यालयीन सरळसेवा परिक्षार्थी युवक, युवती सहभागी होणार आहेत. मंगळवारी (ता. २३) सकाळी दहा वाजता ऑनलाईन विरोधी परीक्षा आक्रोश महामोर्चाचे आयोजन महात्मा फुले स्मारक आयटीआय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT