धर्माबादमध्ये डेमो हाऊसचे भूमिपूजन 
नांदेड

'घर कसे असावे'; येताळ्यात उभारतोय घरकुलाचा डेमो

येताळा येथे उभारण्यात येत असलेल्या डेमो हाऊसचे भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्षा पद्मा रेड्डी सतपलवार यांच्या हस्ते करण्यात आले.

सुरेश घाळे

धर्माबाद ( जिल्हा नांदेड ) : शासनाच्या प्रधानमंत्री आवास व रमाई आवास योजनेअंतर्गत तालुक्‍यातील येताळा येथे ‘ घर कसे असावे ’ याचे उदाहरण देणारे डेमो हाऊस उभारण्यात येत आहे. हे डेमो हाऊस तालुक्‍यातील आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुले उभारताना मार्गदर्शक ठरणार आहे. तालुक्यातील प्रधानमंत्री आवास व रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम दर्जेदार व्हावे, ती सर्व सोयीधायुक्त असावीत तसेच अनुदान निधीचा विनियोग व्हावा, यासाठी लाभार्थ्यांनी डेम्मो हाऊसचे अनुकरण करून आपले घरकुल निर्माण करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे यांनी केले आहे.

येताळा येथे उभारण्यात येत असलेल्या डेमो हाऊसचे भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्षा पद्मा रेड्डी सतपलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कनिष्ठ अभियंता पिंजारी अहेमद, इंजिनिअर आर. जी. हाके, व्ही. बी. जाधव, सरपंच तुळशीराम एंगलोड, एम. पी. बैलके यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - ३ जून रोजी निफ्टीने नव्या उच्चांकाला गवसणी घातली. पहिल्यांदाच निफ्टीने 15 हजार 700 चा उच्चांक गाठला.

कमी खर्चात, कमी जागेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण पूरक व सर्व सोयीधायुक्त घरकुल बांधकाम असणारे हे डेमो हाऊस उभारण्यात येत आहे. याच प्रकारे शासनाच्या विविध आवास योजनेतून घरकुले उभी राहावीत, असा यामागे मानस आहे. राज्य शासनाने सर्वांसाठी घरे २०२२ हे धोरण स्वीकारले असून शासनाने प्रत्येक पंचायत समिती स्तरावर एक डेमो हाऊस घरकुलाचे बांधकाम मंजूर केले असून यासाठी एक लाख ४० हजार रुपयेचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

त्याचबरोबर प्रशिक्षित गवंडी उपलब्ध व्हावा यासाठी घरकुलाचे बांधकाम करतांना गवंडी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जेणेकरुन ग्रामीण भागातील घरकुलाचे निर्माण तंत्रशुद्ध पद्धतीने व दर्जेदार होण्यास मदत होणार आहे. सदरील बांधकाम सुरु झाल्यापासून ४५ दिवसात पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले असून पंचायत समिती धर्माबादच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील इच्छुक गवंडी यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे यांनी केले आहे.

येथे क्लिक करा - शहरातील लॉकडाउन उठविण्यासंदर्भात गुरूवारी शासनाने महापालिकेस स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली

प्रत्येक घरकुल लाभार्थी डेमो हाऊसला भेट देणार

शासनाच्या विविध योजने अंतर्गत घरे बांधताना हाऊस डिझाइन टायपोलॉजिज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. घरकुल सामाजिक व सांस्कृतिक दृष्टया सक्षम बनवणे. बांधकाम खर्च कमी करणे. उच्च प्रतीचे काम करताना ते पर्यावरण पूरक उभारणे याला डेमो हाऊसमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. हे एक प्रात्यक्षिक घर राहणार असून आवास योजनेत घरकुल मंजूर झालेला लाभार्थी प्रथम या डेमो हाऊसला भेट देणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT