nanded sakal
नांदेड

Nanded News : पतीने मारहाण करून केला पत्नीचा खून

घरी बसून दारू पिण्यास केला विरोध

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : घरात बसून दारू पिण्यास विरोध केल्यामुळे पतीने पत्नीला जबर मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला असून घटनेनंतर आरोपी पती फरार झाला आहे. ही खळबळजनक घटना थडीसावरगाव (ता. देगलूर) येथे सोमवारी (ता. ११) रात्री घडली.

अनुसया इरवंत पाटील असे मृत पत्नीचे नाव आहे. थडी सावरगाव येथील इरवंत पाटील आणि अनुसया पाटील या पती पत्नीमध्ये वाद झाला. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या राहात्या घरी अनुसया पाटील आणि त्यांचे पती इरवंत पाटील यांचे घरी दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झाले.

त्यात इरवंत पाटील यांनी तिला कशाने तरी मारहाण करून उजव्या डोळ्यावर, उजव्या हातावर, पाठीवर, मांडीवर डोक्यात मारून गंभीर जखमी केले. त्यात तिचा मृत्यू झाला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी अनुसया यांचे वडील यादवराव भिमराव लक्कावार (वय ७०, रा. टाकळी मोठी ता. डोंगळी, जि. कामारेड्डी, तेलंगणा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून देगलुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार फड करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून विश्‍वासघात केला’: बाळासाहेब थोरातांचा आरोप, निवडणुकीनंतर महिलांना दिला धक्का

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांच्या हातात अजिबात टिकत नाही पैसा, नको तिथे अति खर्च करून गरजेच्या वेळी होतात कंगाल

तोंड झाकलं की थेट रेड कार्ड! FIFA World Cup पूर्वी हे नवे नियम होणार लागू; खेळाडूंच्या टाईमपासला बसणार लगाम

Latest Marathi News Live Update : शिवराज्याभिषेक परवानगीच्या मागणीसाठी तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT