nanded sakal
नांदेड

Nanded : लाेकसभेच्या पार्श्वभूमीवर नाराज पदाधिकाऱ्यांना ‘अच्छे दिन’ ; बैठका, मेळाव्याच्या माध्यमातून पक्षांकडून वातावरण निर्मिती

यंदाचे वर्ष पूर्ण निवडणुकीत जाणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने हिवाळ्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून बैठका, मेळावे आयोजित करून वातावरण निर्मिती केली जात आहे. मतदारांशी विविध माध्यमांतून संपर्क केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : यंदाचे वर्ष पूर्ण निवडणुकीत जाणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने हिवाळ्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून बैठका, मेळावे आयोजित करून वातावरण निर्मिती केली जात आहे. मतदारांशी विविध माध्यमांतून संपर्क केला जात आहे. निवडणुकीचा काळ असल्याने पक्षातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. जिल्हास्तरावर काम करणारे नेते सक्रिय झाले असून फिरताना दिसत आहेत.

लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याने महाविकास आघाडी व महायुतीच्या घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून मतदारांशी संपर्क केला जात आहे. मतदान केंद्रनिहाय बांधणी, संघटनात्मक पातळीवर पदाधिकारी नियुक्त्या करण्यात येत आहेत. राजकीय पक्षांची संख्या वाढल्याने पदांचा सुकाळ झाला असून कार्यकर्त्यांचा दुष्काळ पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

महायुतीच्या जागा वाटपात नांदेडची जागा भारतीय जनता पक्षाला सुटणार हे निश्चित असल्याने भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या तयारीला गेल्या काही महिन्यांपासून लागला आहे. प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे घेण्यात आले आहेत.

तसेच संघटनात्मक पातळीवर बदल करून नाल्यांना संधी देण्यात आली आहे. महिलांचे मेळावे घेऊन विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मीच उमेदवार राहणार व निवडून येणार असा दावा केला आहे. तसेच त्यांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये जनसंपर्क वाढविला आहे. त्यांनी स्वतःची स्वतंत्र निवडणूक यंत्रणा कामाला लावली आहे.

पक्षाकडून मनधरणी सुरू

भोकर विधानसभा मतदारसंघात अर्धापूर तालुक्याचा समावेश होतो. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघातून जास्त मताधिक्याची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. या मतदारसंघातून अशोक चव्हाण यांना लोकसभेसाठी नाममात्र मताधिक्य मिळाले होते. त्यात अर्धापूरचा वाटा खूप मोठा होता. पण लोकसभा निवडणुकीच्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना ९८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. हेच मताधिक्या साठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षात अडगळीत पडलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात येत आहे.

काँग्रेसच्या उमेदवाराबाबत उत्सुकता

नांदेडची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला सुटणार हे निश्चित आहे. पण काँग्रेसचा उमेदवार कोण असेल? हे अद्याप अनिश्चित आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी फारसे उत्सुक नसले तरी तेच काँग्रेसचे उमेदवार असतील, असे काँग्रेसचे पदाधिकारी सांगत आहेत. जर दुसरा उमेदवार देण्याची वेळ आली तर डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

प्रभुकुंज ते दुबईचे रेस्टॉरंट! आशा ताईंच्या निधनानंतर त्यांच्या अफाट मालमत्तेचा मालक कोण? त्यांच्या मृत्युपत्रानुसार...

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला 'या' शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करा; आयुष्यात येईल अखंड समृद्धी

हा मुलगा खरंच १४ वर्षांचा आहे? ललित मोदीचं Vaibhav Sooryavanshi बाबत खळबळजनक विधान; म्हणाले, माझा मुलगा या वयाचा आहे...

SCROLL FOR NEXT