nanded muncipal  sakal
नांदेड

Nanded News : सफाई कामगारांचे आंदोलन सुरू ; नांदेड महापालिका प्रशासनाला द्यावे लागणार लक्ष

महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरातील स्वच्छता आणि साफसफाईचे काम गेल्या दोन चार दिवसांपासून बंद झाले आहे. शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढिग रस्त्याच्या कडेने दिसून येत आहेत. त्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर बनण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छता, साफसफाई, घनकचरा व्यवस्थापनाचे काम आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीला दिले आहे. या कंपनीच्या माध्यमातून शहरात दैनंदिन साफसफाईची आणि घनकचरा व्यवस्थापनाचे काम होते. त्यासाठी सफाई कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, या कंपनीमार्फत कामगारांचे वेतन वेळेवर होत नसल्याच्या याआधीही तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासन आणि कंपनी तसेच कामगारांच्या वतीने संयुक्त बैठक घेऊन समस्याही सोडविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, पुन्हा तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर होत आहे.

दरम्यान, नांदेड महापालिका लक्ष देत नसल्यामुळे अखेर कंत्राटी कामगारांनी कालपासून काम बंद आंदोलन सुरू केले असून दुसऱ्या दिवशी बुधवारीही (ता. १७) आंदोलन सुरू होते. आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीकडून कामगारांचे वेतन दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत करण्याचे वचन महापालिका प्रशासनाने महापालिका कामगार कर्मचारी संघटनेला दिले होते. परंतु महापालिका प्रशासनाने आपले वचन पाळले नसल्यामुळे मंगळवारपासून (ता. १६) कंत्राटी कामगारांनी आपले दैनंदिन काम सकाळी सहा वाजल्यापासून बंद केले आहे. काम बंदचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनला लक्ष द्यावे लागणार आहे.

महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी आर अँड बी इन्फ्रा कंपनीला नियुक्त केले आहे. या सगळ्या नियोजनासाठी महापालिकेच्या वतीने त्यांना दोन कोटी रुपये दिले जातात. सदरील कंपनीला याबाबत धनादेश देण्यात आला असून लवकरच कामगारांच्या खात्यावर पैसे जमा होतील, अशी माहिती कंपनीने महापालिका प्रशासनाला दिली आहे.

— गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त

आर अँड बी इन्फ्रा कंपनीला कचरा वाहतुकीचे व कामगारांचे वेतन महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले असून सदर कामगारांचे वेतन होईल, असे आश्वासन दिले आहे. परंतु कामगारांच्या बॅंक खात्यावर जोपर्यंत वेतन जमा होणार नाही तोपर्यंत स्वच्छतेच्या कामाला सुरुवात होणार नाही, अशी ठाम भूमिका कामगारांनी घेतली आहे.

— गणेश शिंगे, संस्थापक अध्यक्ष, महापालिका कामगार कर्मचारी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update : १९ व्या फेरीत सुनेत्रा पवारांनी केला पराक्रम, तब्बल १ लाख ६८ हजार मतांची आघाडी

Thalapathy Vijay Victory : 40 वर्षांचा अनुभव अन् अचूक टायमिंग! कोण आहेत ज्योतिषी राधन पंडित? ज्यांनी 'थलपती'च्या विजयाचं केलं होतं भाकीत?

Thermos Linked to Eye Injury Risk: थर्मास ठरतोय डोळ्यांसाठी धोकादायक? नव्या समस्येमुळे जगभरात ८ दशलक्षांहून अधिक प्रोडक्ट्सचा रीकॉल

'तुझा नेता हरतोय...' तरुणाने अफवांवर विश्वास ठेवला; थलपती विजयच्या चाहत्याने निकालाआधीच टोकाचा निर्णय घेतला

West Bengal Election Results : पश्चिम बंगालमध्ये ममतांचा गेम कसा पलटला? भाजपच्या ५ डावांनी बदललं संपूर्ण राजकारण!

SCROLL FOR NEXT