Nanded bhokar street light electricity supply  
नांदेड

Nanded News : भोकर शहरातील पथदिवे झाले प्रकाशमान

मागील अनेक दिवसांपासून शहरातील पथदिवे बंद असल्याने नागरीकांना नाहक त्रास

सकाळ वृत्तसेवा

भोकर : मागील अनेक दिवसांपासून शहरातील पथदिवे बंद असल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागला. सध्या सणासुदीचे दिवस असूनही पालिकेने याकडे लक्ष दिले नाही. ‘सकाळ’मधून बातमी प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन पालिकेने पथदिव्याखाली असलेला अंधार दूर केल्याने आता शहरातील मुख्य रस्ते प्रकाशयम झाले आहेत.

नगरपालिका अस्तित्वात आल्याने शहरातील विजेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि शहर प्रकाशमय झाले. पथदिवे, हॉयपावर विजेचे मर्क्युरी बसविण्यात आली. या कामात हलगर्जीपणा करुन गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या संबधीतांनी यावर काहीच कार्यवाही केली नाही. सदरील विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेने एका कंत्राटदारांकडे ही जबाबदारी सोपवली होती. दरम्यान शहरात वीजपुरवठा सुरळीत होता.

अचानक त्या कंत्राटदारास कामबंद करायला सांगितले आणि स्वतः पालेकेने याची जबाबदारी घेतली. तेव्हापासून शहरातील विजेच्या समस्या निर्माण झाल्या. शहरातील मुख्य रस्त्यावर दुभाजकात पथदिवे आणि चौकात हायपावर मर्क्युरी बसविण्यात आले आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून सदरील पथदिवे बंद झाली होती. रस्त्यावर अंधार झाल्याने नागरीक व वाहतुकीची समस्या निर्माण झाली. अण्णाभाऊ साठे जयंती, पोळा आणि गणेशोत्सव असे सण असल्याने अशा दरम्यान शहरात अंधार असल्याने नागरीकांत तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

याबाबत ‘सकाळ’मधून शुक्रवारी भोकर शहरातील पथ दिव्याखाली अंधार अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेऊन पालिकेने मागील दोन दिवसांपासून बंद झालेले पथदिवे सूरू केल्याने आता शहरातील रस्ते प्रकाशमान झाल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या काळातही असाच विजपुरवठा सुरळीत राहिल याची काळजी घेणे गरजेचे आहे अशी नागरीकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

Bihar Crime News : भाजप नेत्याच्या पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, मेहुणा गंभीर जखमी, भर रस्त्यात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Latest Marathi News Live Update : खासदार संजय राऊत पुण्यात येताच वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी

Eknath Shinde Hasan Mushrif : गोकुळ दूध संघाच्या राजकारणात एकनाथ शिंदेची एन्ट्री, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआदी दिल्या सूचना; हसन मुश्रीफांना अप्रत्यक्ष पाठबळ

SCROLL FOR NEXT