file photo 
नांदेड

मुदखेड पालिकेचे नगराध्यक्ष मुजीब अन्सारीसह काँग्रेस नगरसेविकेच्या पतीवर अट्रॅासिटीचा गुन्हा दाखल

गंगाधर डांगे

मुदखेड  (जिल्हा नांदेड) : मुदखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार व काँग्रेस नगरसेविकेचा पती अब्दुल सलाम याच्यासह चालकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

मुदखेड पालिकेत दुसऱ्याच्या नावावर ठेकेदारी करणाऱ्या एका ठेकदाराने मुदखेडचे काँग्रेसमय झालेले नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार, काँग्रेस नगरसेविका अतिया प्रवीण यांचे पती अब्दुल सलामसर व नगराध्यक्षाचे वाहनचालकविरुध्द अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तक्रार दिल्यानंतर मुदखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तु नगरपालिकेत का आलास, तेरा यहा कुछ नही होनेवाला

प्राप्त माहितीनुसार नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार यांनी सुध्दा पोटठेकेदाराविरुध्द दरोडा टाकल्याची तक्रार दिली असुन ती पोलिसांनी तपासावर ठेवली आहे. दुसऱ्याच्या एजन्सीवर कंत्राटे घेऊन काम करणारे सब ठेकेदार बजरंग वामनराव खोडके रा. मुदखेड यांनी मुदखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार (ता. आठ) फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजताचे वेळेदरम्यान मुदखेड नगरपालिकेत ते आपल्या कामासाठी मुख्याधिकारी यांना भेटण्यास गेले असतांना तु नगरपालिकेत का आलास, तेरा यहा कुछ नही होनेवाला असे नगराध्यक्षाच्या एका माणसाने त्याला सांगितले. यावेळी जातीवाचक शिविगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळी नगराध्यक्ष मुजिब अन्सारी, त्याचा चालक आणि अब्दुल सलामसर यांनी हा सर्व प्रकार माझ्यासोबत केला. त्यावेळी तेथे हजर असलेले पत्रकार कृष्णा देशमुख आणि सुमेध खोडके यांनी मला नगराध्यक्षाच्या तावडीतून सोडवले असे खोडके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

मुजिब अन्सारी यांचा दरोड्याचा अर्ज सध्या तपासावर

यावरुन मुदखेड पोलीसांनी आज अनुसूचित जाती- जमाती प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात मुदखेडचे नगराध्यक्ष मुजिब अन्सारी, अब्दुल सलमान आणि नगराध्यक्षाचा चालक अशा तिन लोकांची नावे घोडके यांनी आपल्या तक्रारीत दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास अर्धापूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार नगराध्यक्ष मुजिब अहेमद अन्सारी यांनी सुध्दा ठेकेदार बजरंग वामन खोडके यांच्याविरुध्द दरोडा टाकल्याची तक्रार दिली आहे. मुजिब अन्सारी यांचा दरोड्याचा अर्ज सध्या तपासावर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

नगराध्यक्ष मुजीब जागीदार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला होता

तक्रारदार बजरंग खोडके व नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जागीरदार यांच्यामध्ये यापूर्वी देखील देवाणघेवाणीवरुन अनेक वेळा तू तू- मै मै झाली होती. एवढेच नाही तर ठेकेदार बजरंग खोडके यांनी मागे काही महिन्यापूर्वी पालिकेतील केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी नगराध्यक्ष मुजीब अन्सारी यांनी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार नगराध्यक्ष मुजीब जागीदार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला होता.

यापूर्वी भाजपच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षासह मुदखेड शहराध्यक्षावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता

मुदखेड शहरामध्ये लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरुन तू तू- मै मै होत असून याचे पर्यवसान थेट ॲट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यापर्यंत होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नुकतेच एक आठवड्यापूर्वी पालिकेत कचरा टाकण्याच्या कारणावरुन घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराने भाजपच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षासह मुदखेड शहराध्यक्षावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.
मुदखेड पालिकेत सुडाचे राजकारण पेटले असून वेगवेगळ्या प्रकारचे पैलू वेगवेगळ्या माध्यमातून मुदखेडच्या जनतेच्या समोर येत आहेत. मुदखेड पालिकेच्या निवडणुका आठ महिन्यावर येऊन ठेपला असून पुढे निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळे प्रकार मुदखेडच्या जनतेसमोर येत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: Google Mapsचा घात! लग्नाला निघालेले तरुण थेट नाल्यात; कार हवेत लटकली

India vs New Zealand T20 World Cup Final: टी-२० विश्वकरंडकाची अंतिम लढत; सूर्यकुमारच्या संघासमोर न्यूझीलंडचे आव्हान

Pune Crime News : पुण्यात महिला दिनीच धक्कादायक प्रकार, “तू खूप सुंदर दिसतेस” म्हणत डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; आरोपी सीसीटीव्हीत कैद

Latest Marathi News Live Update : राष्ट्रपतींवर टीकेबद्दल मोदींकडून ममता लक्ष्य

IND vs NZ Final Live Telecast: आज ठरणार विश्वविजेता! सामना किती वाजता आणि फ्री लाईव्ह कुठे पाहायचा? वाचा पूर्ण डिटेल्स

SCROLL FOR NEXT