Nanded Ganpati Visarjan 2023 changes in transport system today police department  esakal
नांदेड

Nanded Ganpati Visarjan 2023 : वाहतूक व्यवस्थेत आज बदल; ‘श्री’ विसर्जनानिमित्त पोलिस विभागातर्फे बंदोबस्त

वाहतूकीस अडथळा होऊ नये, यासाठी पर्यायी मार्गाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : श्री गणेश विसर्जनानिमित्त शहरात गुरूवारी (ता. २८) सकाळी अकरा ते रात्री बारा वाजेपर्यंत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये वाहतुक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश काढले आहेत. त्याचबरोबर शहर आणि जिल्ह्यात महत्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नांदेड शहराच्या विविध भागातून गुरूवारी श्री गणेश विसर्जन होणार असून मुख्य रस्त्यावर विसर्जनाच्या व वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत एक दिवसासाठी तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी मार्गांवरील वाहतूकीस वळण देऊन बदल करण्यात येत आहे. वाहतूकीस अडथळा होऊ नये, यासाठी पर्यायी मार्गाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

१) वजिराबाद चौकाकडून श्रीनगर, वर्कशॉपकडे जाणारी वाहतूक वजिराबाद चौक, पोलीस मुख्यालय कार्नर, लालवाडी अंडर ब्रिज, शिवाजीनगर, पिवळी गिरणी ते गणेशनगर वाय पॉईन्टकडे जाण्या येण्यासाठी वापर करतील.

२) राज कॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतूक राज कॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर, आनंदनगर, नागार्जुना टी पॉईंट, अण्णाभाऊ साठे चौक, यात्री निवास पोलीस चौकी, अबचलनगर ते पुढे जाण्या येण्यासाठी वापर करतील.

३) गोवर्धन घाट पुलावरुन नांदेड शहरात येणारी वाहतूक ही तिरंगा चौक, पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रिज, शिवाजीनगर पिवळी गिरणी ते गणेश नगर वाय पॉईंटकडे जाण्यासाठी वापर करतील.

४) सिडको हडकोकडुन नांदेड शहरात येणारी वाहतुक साई कमान कौठा, पोलीस चौकी, रवीनगर, गोवर्धन घाट नवीन पुल, तिरंगा चौक, पोलीस मुख्यालय कार्नर, लालवाडी अंडर ब्रिज, शिवाजीनगर, पिवळी गिरणी ते गणेश नगर वाय पॉईंटकडे जाण्यासाठी वापर करतील.

वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग

१) जुना मोंढा, देना बँक, महावीर चौक, तरोडेकर मार्केट, वजिराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर ते आयटीआय चौकापर्यंत जाण्या येण्यास बंद राहील.

२) राज कॉर्नरकडून आयटीआयकडे येण्यासाठी राज कॉर्नर, वर्कशॉप टी पॉईंट, श्रीनगर ते आयटीआय पर्यंत डावी बाजू बंद राहील.

३) राज कॉर्नर ते तरोडा नाक्याकडे जाण्यासाठी वाहतुकीसाठी डावी बाजू बंद राहील.

४) सिडको, हडको, जुना मोंढ्याकडे येणारी वाहतुक पुर्णपणे बंद राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT