Nanded Hadgaon bus stand bad condition 
नांदेड

नांदेड : हदगावचे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात

बोगस कामांचा परिणाम : प्रवाशांसह बसचालकही झालेत त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

हदगाव : येथील बस स्थानकात कमालीची दुरावस्था झाली असून संपूर्ण परिसरात पावसाच्या पाण्याचे डबके साचल्याने प्रवाशांना चिखल तुडवत बसमध्ये चढ-उतार करावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांना चिखल पाण्यातून ये-जा करतांना मोठी कसरत करावी लागत आहे. नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन ही समस्या मार्गी लावावी अशी प्रवाशांमधून मागणी होत आहे.

अगोदर आलेले कोरोनाचे संकट आणि त्यानंतर चालक-वाहकांच्या दिर्घकाळ चाललेल्या संपामुळे परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. असे असतांना देखभाल दुरुस्तीसाठी महामंडळाकडे निधी उपलब्ध होणे दुरापास्त मानले जाते. तथापी बस सेवा पुर्व पदावर आली तरी अजुनही उत्पन्नात अपेक्षित प्रगती झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

दरम्यान बस स्थानकाच्या समोर नालीचे बांधकाम सुरू असल्याने डेपोचे आत येणारे गेट बंद केले असल्याने बाहेर जाणाऱ्या गेटमधूनच बसेसची ये-जा सुरू आहे. परिणामी बसचालकांना बस बसस्थानकात नेण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय प्रवाशांनाही डबक्यातून जाताना सावध भूमिका घ्यावी लागत आहे.

रस्त्याच्या कडेला होणारे नाली बांधकाम व रस्त्याचे नवीन काम यामुळे निश्चितच रस्त्याची उंची वाढणार आहे. परिणामी बस स्थानकातील जागेत पावसाचे पाणी साचण्यास मदतच होणार आहे. यासाठी पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. हदगाव नगर परिषद प्रशासनाने प्रवाशांच्या हितासाठी जन हितार्थ बस स्थानक परिसरात गिट्टी व त्यावर छुरी पसरवून साचलेले पाण्याचे डबके बुजवून प्रवासी नागरीकांना कायमस्वरुपी दिलासा देण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: स्मशानभूमीतील धुरावर नियंत्रण, मुंबईतील 8 ठिकाणी 'इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर' यंत्रणा बसवणार; महापालिकेचा निर्णय

BMC: 'खिचडी'च्या तव्यावर 'जर्मनी'ची फोडणी! महापौर-विरोधी पक्षनेत्यात वादाचा तडका

Marathi News Live Updates : दिल्लीत मुसळधार, द्वारका मेट्रो स्टेशन परिसरात पाणीच पाणी

Khed Shivapur Road Block: खेड-शिवापूर येथील रस्ता रोकोचा फटका; नायगावमध्ये वाहनांच्या पाच किलोमीटर रांगा

Thergaon Dangerous Road: धोकादायक रस्त्यांमुळे जिवाशी खेळ; थेरगावातील स्थिती; उंच-सखल भागांमुळे दुचाकीस्वाराचे होताहेत अपघात

SCROLL FOR NEXT