Nanded Hospital Death Esakal
नांदेड

Nanded Hospital Death: मोठी बातमी! नांदेड मृत्यूप्रकरणात अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; रुग्णालयातील मृतांची संख्या 41 वर

बालकासह मातेचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती

अंकिता खाणे (Ankita Khane)

शासकीय रूग्णालयातील मृत्यूचा मुद्दा सूरू असतानाच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयामध्ये 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश होता. (Latest Marathi News)

दरम्यान, बालकासह मातेचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. तर, नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Marathi Tajya Batmya)

कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात या संबधित तक्रार दाखल केली आहे. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात भरती असताना त्यांना बाहेरुन ४० हजारांहून अधिकची औषध खरेदी करण्यास सांगितलं. रक्त व इतर तपासण्यासाठीही देखील पैसे खर्च करावे लागले. अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.(Latest Maharashtra News)

नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि तिचाही मृत्यू झाला. महिलेचाही मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळे महिलेचे नातेवाईक असलेल्या कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

त्यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी रात्री शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस आर वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT