file photo 
नांदेड

नांदेड : ग्रामपंचायतीच्या प्रारूप मतदार याद्यांनी केली पती- पत्नीची ताटातूट, मतदार याद्यावर आक्षेपांचा पाऊस

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पहिल्या टाप्याची प्रक्रिया सुरू असून निवडणूक विभागाने प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदार यादीत खूप मोठा घोळ दिसून आल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी चक्रावून गेले आहेत. या प्रारूप मतदार यादीत पतीचे नाव एका वार्डात मतदान तर पत्नीचे नाव दुस-या वार्डात टाकून ताटातूट केली आहे. या मतदार याद्यांवर आक्षेपांचा पाऊस पडला  असून तालुक्यातील विविध गावातून सुमारे 140 अक्षेप दाखल झाले आहेत.यात सर्वाधिक लोणी खुर्द मधून सुमारे 59 आक्षेप दाखल झाले आहेत. तहसील कार्यालयात दाखल झालेल्या सर्व आक्षेपांची तपासणी करण्यात येत असून अंतिम यादी सोमवारी (ता 14) रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.

तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदांचे आरक्षण घोषित झाल्यावर ग्रामीण भागातील थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण तापत आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला नसला तरी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीचे गट सक्रिय झाले असून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे.

कोणत्याही निवडणुकीत मतदार यादीचे अनन्यसाधारण महत्व आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उपयोगात येणा-या प्रारूप मतदार याद्या निवडणूक विभागाने प्रकाशित केल्या आहेत. या मतदार यादीत घोळ झाल्याने स्थानिक उत्सुक उमेदवारांनी लेखी आक्षेप घेतले आहेत. या मतदार याद्यात पती - पत्नीची ताटातूट झाली आहे. एका वॉर्डत पतीचे नाव तर दुस-या वार्डात पत्नीचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच एकाच कुटूंबातील सदस्यांचे नांव देखील वेगवेगळ्या वार्डत सामाविष्ट झाले आहे.

या मतदार याद्या पाहिल्यावर स्थानिक नेत्यांना व कुटूंब प्रमुखांना धक्काच बसला आहे. या चुकीच्या मतदार याद्यांवर आक्षेपांचा पाऊस पडला आहे. गावनिहाय आक्षेपांची संख्या पुढील प्रमाणे आहेत. पाटणूर एक, पार्डी तीन, चाभरा 14, चोरंभा एक, खैरगाव बुद्रुक एक, लोणी खुर्द 59, लहान एक, लोणी बुद्रूक तीन, येळेगाव तीन, पिंपळगाव एक, शैलगाव बुद्रुक 26, बारसगाव दोन, शाहपूर दोन, खैरगांव दोन, देळूब खुर्द चार, धामदरी, पाच, मालेगाव दोन, बामणी दोन, मेंढला बुद्रूक एक आसे आक्षेप दाखल झाले आहेत.

तहसील कार्यालयात दाखल झालेल्या आक्षेपांची मंडळ अधिका-यांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. तपासणी झाल्यावर अंतिम यादी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रकाशित करण्यात येणार आहे अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : ...अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; विदर्भात पुढील 10-12 दिवस कसं असेल हवामान? यंदा 90 टक्के पावसाचा अंदाज

Lalit Modi: हा कसला मूर्ख खेळ आहे?’ सचिन द्रविडसह दिग्गजांनी २००७ च्या T20 World Cup ला दिला होता नकार, ललित मोदींचा खुलासा..

Numerology : टॉम अँड जेरीसारखे असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुझं-माझं जमेना अन् तुझ्याविना करमेना, शेवटच्या श्वासापर्यंत टिकतं नातं

Chardham Yatra: बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरासमोर 'छैंया-छैंया' गाण्यावर डान्स! मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये, VIP दर्शनासाठी नवी SOP जाहीर

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या साजिद बेग यांची निवडणुकीतून माघार

SCROLL FOR NEXT