maratha reservation esakal
नांदेड

Nanded News : नांदेडला पुनर्तपासणीत नोंद नाही

मराठा-कुणबी तपासणी; पूर्वी आढळल्या एक हजार २०४ नोंदी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मराठा - कुणबी नोंदीच्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड येथे कमी सापडल्या होत्या. त्यामुळे सेवानिवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे आणि त्यांच्या समितीने पुन्हा नोंद तपासण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुनर्तपासणीच्या सूचना यंत्रणेला दिल्या होत्या. दरम्यान, यात कुणबी, कुणबी - मराठाची एकही नोंद आढळली नाही. त्यामुळे आत्तापर्यंत एक हजार २०४ नोंदीच आढळून आल्या आहेत.

आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून नोंदी कमी सापडल्यामुळे याबाबत काही ठिकाणी आक्षेप घेऊन हा प्रकार लक्षात आणून दिला होता. त्यानंतर मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी, मराठा-कुणबीच्या नोंदी शोधणे आणि त्यावर अभ्यास करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील एक विशेष समिती गठित केली. त्या समितीने मराठवाडा आणि विदर्भात तसेच नंतर राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याच्या अनुषंगाने काम सुरू केले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी राऊत यांनी कुणबी नोंदी शोधकार्यात विशेष लक्ष घालून हयगय करणा-या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कान टोचले होते. तसेच मोडी लिपीत अथवा इतर भाषेतील दस्तावेजाची संबंधित अभ्यासकांकडून तपासणीच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार यंत्रणेने पुनर्तपासणी केली परंतू, यात एकही नोंद आढळली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हैदराबादलाही गेली होती समिती

मराठवाडा हा पूर्वी निजाम संस्थानात होता. त्यामुळे हैदराबाद येथे काही नोंदी सापडण्याची शक्यता होती. त्या अनुषंगाने मराठा कुणबीच्या नोंदीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे आणि त्यांच्या समितीतील सदस्य तसेच मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकरराव आर्दड हे ता. सहा डिसेंबर दरम्यान तेलंगणातील हैदराबादला गेले होते. त्यांच्यासोबत नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह देगलूरचे उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम व इतरही अधिकारी, कर्मचारी होते. या समितीने तेथे पाहणी केली मात्र, त्यांना किती नोंदी आढळल्या किंवा इतर माहिती अद्याप मिळू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT