file photo 
नांदेड

नांदेड : अर्धापुरात पुर्णा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाचा फटका, एकहजार हेक्टरच्यावर शेतीला पाणी नाही

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाला सामोरे जात आहेत. यंदा पुर्णा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरलेले असतांना अर्धापूर तालुक्यातील सुमारे दहा ते बारा गावतील शेतीला पाणी यंदाच्या हंगामात मिळणे अवघड झाले आहे. पाणी सोडण्यापुर्वी वितरिकेची दुरुस्ती न केल्याने पाणी या गावात येणे शक्य नाही अशा प्रतिक्रिया शेतक-यातून व्यक्त केल्या जात आहेत.

या प्रकल्पाच्या अधिका-यांनी वितरिकेच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने शेतक-यांना मोठा फटका बसत आहे. या महत्त्वाच्या कामाकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आसल्यामुळे शेतक-यावर ही वेळ आली आहे. अशी शेतक-यांची भावना आहे. सध्या या प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील काही गावात सुरु आहे.  या वितरिकेचे दुरुस्तीचे काम तातडीने झाल्यास या गावातील शेतीला पाणी मिळू शकते.

अर्धापूर तालुक्यातील शेतीला ईसापूर व पुर्णा प्रकल्पाचे पाणी मिळते. यंदा ही दोन्ही धरणे पुर्ण क्षमतेने भरली आहेत. ही धरणे भरल्यामुळे शेतक-यात समाधानाचे वातावरण होते. खरिपाच्या हंगामाने दगा दिल्यावर सर्व भिस्त रब्बीच्या हंगामावर आहे. पण पाटबंधारे विभाग व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षपणाची मोठी किंमत शेतक-यांना मोजावी लागणार आहे.

पूर्णा प्रकल्पाच्या टोकाला अर्धापूर तालुक्यातील काही गावे आहेत. या प्रकल्पाच्या वितरिकेचे दुरुस्तीचे कामे रब्बी हंगामापुर्वी करणे आवश्यक होते. पण ही कामे करण्यात आली नाहीत. त्यामुळे सावरगाव, उमरी, देळूब खुर्द व बुद्रूक, भोगाव, शेणी, अर्धापूर, सांगवी, खडकी,आदमपूर आदी गावातील शेतीला पाणी मिळणे अवघड झाले आहे. यंदा शंभर टक्के धरण भरुन सुध्दा शेतीला फायदा होणार नाही.

पुर्णा प्रकल्पाच्या टोकाला असलेल्या गावातील शेतीला पाणी मिळावे यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला. यंदा हे धरण शंभर टक्के भरले आहे. शेतीला यंदाच्या हंगामात मिळावे यासाठी कार्यकारी अभियंत्याची भेट घेवून कैफियत मांडली. त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना भेटण्याचा सल्ला दिला. वितरिकेचे काम तातडीने झाल्यास या गावतील शेतीला पाणी मिळू शकते. अधिका-यांनी या कामाकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती माजी सभापती बाबुराव हेंद्रे यांनी दिली.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: शिंदेंच्या दरे गावात फडणवीस उभारणार तणाव मुक्तीकेंद्र, बजेटमध्ये केली घोषणा; काय म्हणाले?

Viral Video : मॅडमचा शाळेत राजेशाही थाट ! शिकवायचं सोडून विद्यार्थिनींकडून वर्गातच करुन घेतला मसाज, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Farmer Loan: अटी-शर्तींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेतून बाहेर राहणार; राजू शेट्टींनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

Latest Marathi News Live Update : आग्य्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक

अग्निवीरांना निवृत्तीनंतर सरकारी नोकरी मिळणार! महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुनर्वसनासाठी अभ्यास गट स्थापन

SCROLL FOR NEXT