election sakal
नांदेड

Nanded News : दाजीची भाऊजीला धोबीपछाड,दहा जागा जिंकून बाजार समितीवर कब्जा

खासदार प्रताप पाटील चिखलीकर प्रणित बळीराजा परिवर्तन पॅनेलने बाजार समितीवर वर्चस्व सिद्ध केले

सकाळ वृत्तसेवा

कंधार - तालुक्यासह जिल्ह्यातील राजकारणात लक्षवेधी ठरलेल्या कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे खासदार प्रताप पाटील चिखलीकर प्रणित बळीराजा परिवर्तन पॅनेलने बाजार समितीवर वर्चस्व सिद्ध केले. दाजी-भाऊजी यांच्या लढाईत दाजीने भाऊजीला धोबीपछाड दिली असून १८ पैकी दहा जागा जिंकून चिखलीकर गटाने या निवडणुकीत आपला ठसा उमटविला आहे.

भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा बळीराजा परिवर्तन पॅनेल, काँग्रेस आणि शेकाप यांचा शेतकरी विकास पॅनेल आणि बीआरएस, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी व संभाजी ब्रिगेड यांचा तिसरा पॅनेल, असे तीन पॅनेल निवडणुकीत आमनेसामने होते. ही निवडणूक सुरुवातीला तिरंगी होईल असे चित्र होते.

नंतर मात्र खासदार चिखलीकर व आमदार शिंदे या दाजी-भाऊजी प्रणित पॅनेलमध्ये ही निवडणूक झाली. यात चिखलीकर समर्थकांनी बाजी मारली. शेकाप- काँग्रेस प्रणित आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या शेतकरी विकास पॅनेलला सात तर बीआरएस प्रणित तिसऱ्या पॅनेलला एक जागेवर विजय मिळविता आला.

विजयी उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे : सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघात भाजप समर्थक उमेदवार शाहूराज गोरे, शंकर पाटील, व्यंकटी पांढरे, कांशीराम वरपडे, शेकाप व काँग्रेस समर्थक गट- रोहित शिंदे, रमाकांत जोगदंड, ज्ञानेश्वर चोंडे, सेवा सहकारी संस्था महिला- शेकाप- काँग्रेस गटातील विजयी- पुष्पाताई खुडे, जनाबाई नाकाडे, सेवा सहकारी

इतर मागासवर्गीय गटातील भाजप समर्थक सुभाष देशमुख, सेवा सहकारी भटक्या जाती बालाजी झुंबाड, व्यापारी मतदारसंघ भाजप समर्थक शैलेश बोरलेपवार, शेकाप-काँग्रेस समर्थक गिरीश मामडे, ग्रामपंचायत मतदारसंघात भाजप समर्थक सुधाकर कौसल्ये, शेकाप-काँग्रेस समर्थक चंद्रकांत पेठकर, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदारसंघात भाजप समर्थक मारोती पंढरे, ग्रामपंचायत अनु.जाती मतदारसंघात भाजप समर्थक नारायण गायकवाड, हमाल मतदारसंघात बीआरएस समर्थक भागवत कांबळे हे १८ जण विजयी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT