file photo 
नांदेड

नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात नवी भर; विद्यापीठ परिसरात साकारणार बी. एड. महाविद्यालयाची वास्तू

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सन 1968 पासून येथे कार्यान्वित असलेल्या शासकिय अध्यापक महाविद्यालयास आता सुमारे 14 कोटी 50 लाख रुपयांची भव्य वास्तू मिळणार असून लवकरच नांदेडच्या शैक्षणिक वैभवात या परिपूर्ण वास्तुतून विस्तार साधला जाणार आहे. बी. एड. महाविद्यालयाची ही वास्तू साकारावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करुन नांदेडच्या शैक्षणिक हब मधील ही कमतरता भरुन काढली आहे.

नांदेडमधील जुन्या महाविद्यालयांपैकी एक असलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयास स्वतः ची इमारत नव्हती. भाडेतत्त्वावर जागा किरायाने घेऊन हे महाविद्यालय सुरु होते. महाविद्यालयाचा दर्जा ठरविणाऱ्या युजीसीची नॅक कमिटी व नॅशनल कॉन्सील फॉर टीचर एज्युकेशन (एनपीसीई) या संस्थेने सुद्धा महाविद्यालयास स्वतःची इमारत असावी, असे सूचित केले होते.

14 कोटी 41 लाख रुपयांची भव्य वास्तू उभारली जाणार

यासंदर्भात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून शासकीय अध्यापक महाविद्यालयास स्वतंत्र इमारत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या इमारतीसाठी जागेची आवश्यकता होती. अशावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या समवेत बैठक घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात आता या महाविद्यालयास जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  या जागेवर आता 14 कोटी 41 लाख रुपयांची भव्य वास्तू उभारली जाणार आहे.

नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात नवी भर

या इमारतीमध्ये अध्यापनासाठीच्या सुसज्य खोल्या, कार्यालय, ग्रंथालय, पार्किंग, अग्निशमन यंत्रणा, सौरउर्जा प्रकल्प यासह सर्व सोयी राहणार आहेत. ईबीसी वसतिगृहानंतर केवळ आठ दिवसात शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या नवीन वास्तूस शासनाने मान्यता दिली असून नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात नवी भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT